पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थकारणावर होणार परिणाम; मिळकतकर वसुलीत घट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

 • कोरोना व लॉकडाउनचा परिणाम 

पिंपरी : कोरोना आणि लॉकडाउनचा फटका महापालिकेच्या उत्पन्नाला बसला आहे. चालू आर्थिक वर्षात मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट 750 कोटी रुपये आहे. मात्र, बुधवारी (ता. 30) संपलेल्या पहिल्या सहामाहीचा विचार करता 375 कोटींऐवजी केवळ 220 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्‍क्‍यांनी कमी उत्पन्न मिळाले आहे. याचा महापालिकेच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटर होणार बंद; कारण ऐकून मिळेल दिलासा

मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) बंद झाल्यापासून मालमत्ता कर हाच महापालिका उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे 22 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. अनेकांचा रोजगार गेला. अर्थकारणावर परिणाम झाला. कराचा भरणाही कमी झाला. त्यामुळे पाच लाख 27 हजार 338 मिळकतधारकांपैकी केवळ एक लाख 63 हजार 279 जणांनी कर भरला आहे. नागरिकांच्या सोईसाठी वेगवेगळ्या ठिकाणी महापालिकेचे 16 करसंकलन कार्यालये आहेत. कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे. गेल्या सहा महिन्यात थेरगाव करसंकलन कार्यालयात सर्वाधिक 54 कोटी 79 लाख रुपये तर, पिंपरीनगर कार्यालयात सर्वांत कमी एक कोटी 49 लाख रुपयांचा भरणा झाला आहे. 

सहामाही आकडे बोलतात... 

 • गेल्या वर्षी : 341 कोटी 56 लाख 
 • चालू वर्षी : 220 कोटी 1 लाख 
 • उत्पन्न कमी : 121 कोटी 55 लाख 
 • सहामाही उद्दिष्ट : 375 कोटी 
 • वार्षिक उद्दिष्ट : 750 कोटी 

आगीनं आमची रोजी रोटीच केली खाक; पिंपरीतील दीडशे महिलांचा आक्रोश

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर!

शहरातील मालमत्ता 

 • निवासी : 4 लाख 47 हजार 8 
 • बिगरनिवासी : 46 हजार 828 
 • औद्योगिक : 3 हजार 700 
 • मोकळ्या जागा : 8 हजार 781 
 • मिश्र : 15 हजार 819 
 • इतर : 5 हजार 202 

कोरोना व लॉकडाऊनचा परिणाम मिळकतकर वसुलीवर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्‍क्‍यांनी उत्पन्न कमी मिळाले आहे. आता व्यवहार सुरळीत होत आहेत. पुढील सहा महिन्यात मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट आहे. नोंदणी नसलेल्या मिळकतींचा शोध घेऊन कर वसूल केला जाणार आहे. आर्थिक कारणांमुळे कर भरू न शकणाऱ्यांसाठी अभय योजना आहे. त्यामुळे नागरिकांना नियमितकर भरता येईल. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona and lockdown impact of pimpri chinchwad municipal revenue