कोरोनाचा कहर अन् त्यात डेंगी चिकुनगुणियाच्या तापाने फणफणले आळंदीकर

Corona-and-Dengue
Corona-and-Dengue
Updated on

आळंदी - आळंदीच्या वेशीवर कोरोनाचे थैमान असताना आळंदीतील देहूफाटा आणि मंदिर परिसर मच्छरांच्या उपद्रवामुळे तापाने फणफणले आहेत. डेंगी चिकुनगुणिया सदृश्य तापाची लक्षण रूग्णांमधे आढळत असून शंभरपेक्षा अधिक नागरिकांना बाधा झाली आहे. मंदिरापुढे बंदोबस्तासाठी आलेल्या दोन पोलिसांनाही मच्छरांच्या उपद्रवामुळे ताप झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आळंदीतील देहूफाटा परिसरात गेली महिनाभरापासून डेंगी आणि चिकुनगुणियाच्या आजाराने नागरिकांना ताप झाला होता. भोसरी,मोशी,आळंदीतील विविध रूग्णालयात नागरिक उपचार घेत असून अनेकांचे वैद्यकिय अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने या परिसरात जंतूनाशक औषध फवारणीही केली. मात्र आता पुन्हा देहू फाटा आणि मंदिर परिसरात तापाचे रूग्ण वाढत आहेत. कुणाचे हात पाय दुखत आहेत. कुणाला बारिक ताप येत आहे. एकाच कुटूंबातील तिन चार जणांना ताप येत असल्याचे चित्र आहे. गेली दोन तिन महिने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सगळे लक्ष लॉकडाऊनकडे प्रशासनाचे होते. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता,जंतूनाशक फवारणी मोठ्या प्रमाणात झाली नाही. खरे तर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

तब्बल शंभरहून अधिक नागरिक सध्या तापाच्या साथीच्या आजाराने त्रस्त असून एकाच कुटूंबातील तिन चार जणांना उपद्रव झाला आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत असल्याने प्रशासनावर नाराजी आहे. वेळेत कचरा न उचलल्याने मच्छरांची संख्या वाढली. विेशेश करून इंद्रायणी काठच्या परिसरात आणि भागिरथी नाल्यावर मच्छरांचा उपद्रव अधिक आहे. जलपर्णीची बेसूमार वाढ झाली. त्यातच पुंकलिक मंदिर ते स्मशानभूमि परिसरात उघड्यावर सांडपाणी वाहत असल्याने मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरात धुरळणी यंत्राद्वारे जंतूनाशक पावडर आणि फॉंगिंगची मागणी करूनही पालिका वेळच्या वेळी धुरळणी करत नाहीत.

जंतूनाशक पावडरही शहरात अभावानेच मारली जाते. साथीच्या रोगांचा वेगाने फैलाव होत असताना प्रशासन आणि पालिकेचा आरोग्य विभाग मात्र ढिम्म असल्याचे चित्र आहे.

याबाबत नगरसेवक सचिन गिलबिले आणि दिनेश घुले यांनी सांगितले, डेंगी चिकुणगुणियाचे रूग्ण कमी झालेत. मात्र साधे तापाचे रूग्ण आहेत. आरोग्य विभागाने स्वच्छतेत आणि जंतुनाशक पावडर मारण्यात  सातत्य ठेवले तर मच्छरांचा उपद्रव कमी होईल.नागरिकांनी पाणी साठा कमी करून पाणी झाकून स्वच्छ भांड्यात ठेवावे.
महाद्वारातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश गुळुंजकर यांनी सांगितले की,शनि मंदिर,भागिरथी नाला,महाद्वार चौकात नियमित औषध फवारणी केली जात नाही.

नागरिकांनी तक्रारी किती वेळा करायची. लेखी तक्रार करण्यापेक्षा आरोग्य विभागाने नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे केले तरी नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com