जुनी सांगवी, दापोडीतील रस्ते 'फुल्ल', खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

जुनी सांगवी, दापोडीतील रस्ते 'फुल्ल', खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

जुनी सांगवी : पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर झाल्याने जुनी सांगवी व दापोडी परिसरात बँका, स्वस्त धान्य दुकान, किराणामालांची दुकाने, वॉशिंग सेंटर हाउसफुल झाली होती. तसेच, पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँका व एटीमध्ये रांगा लावल्या होत्या.

लॉकडाउनचे सुरुवातीचे पाच दिवस कडक असून, नंतरचे पाच दिवस शिथिल करण्यात येणार आहेत. मात्र, तरी नागरिकांकडून दुकाने, बँका, एटीम, पेट्रोल पंप, मोटार गँरेज, वॉशिंग सेंटर बाहेर गर्दी केल्याचे चित्र सांगवी व दापोडी परिसरात दिसत होते. पैसे काढणे व भरण्यासाठी अनेक बँकांमधून एकच काउंटर सुरू होते. यामुळेही नागरिकांना पैसे काढण्यासाठी तासन् तास रांगेत ताटकळत थांबावे लागले. तर गर्दीमुळे ज्येष्ठांना नाहक त्रास सहन करावा लागला. लॉकडाउनमुळे संभाव्य गर्दी होणार, हे माहिती असूनही जुनी सांगवीतील बँकांनी पुरेशी ग्राहकांची काळजी घेतली नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

स्वस्त धान्य दुकानांसमोरही मोफत तुरडाळ, हरभरा डाळ व नियमित धान्य घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र जुनी सांगवीतील सर्वच दुकानांमधून पहायला मिळत होते. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंतच स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन जाण्यासाठी सोशल मीडियाद्वारे दुकानदारांकडून ग्राहकांना निरोप व सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, पेट्रोल पंपावरही नागरिकांनी गर्दी केली होती.

गाड्या निर्जंतुकीकरणासाठी गर्दी...

अनेक ठिकाणी सध्या गाड्या धुण्यासाठी फोम वॉशिंग निर्जंतुकीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. कोरोनामुळे वॉशिंग सेंटर व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. पूर्वी लिक्विड व साबणाद्वारे गाड्या धूतल्या जायच्या. मात्र, सध्या फोम वॉशिंग व सॅनिटायझरव्दारे निर्जंतुकीकरण करून गाड्या धुण्याची क्रेझ वाढली आहे. लॉकडाउन काळात सेंटर बंद राहणार असल्याने नागरिकांची गाड्या धुवून घेण्यासाठी गर्दी दिसत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com