घरासाठी किती ही धडपड; ना सोशल डिस्टन्सिंग, ना कोरोनाची भाती

आशा साळवी
Sunday, 13 September 2020

  • नागरी सुविधा केंद्रांवर गर्दी
  • सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा 

पिंपरी : सध्या सरकारी योजनांसाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र आणि सरकारच्या महा-ई-सेवा केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, इथे कोणतीही शिस्त पाहायला मिळत नाही. ना सोशल डिस्टन्सिंग ना कोरोनाची भीती. केंद्रावर नुसतीच गर्दी दिसून येत आहे. 'वारंवार सांगूनही नागरिक सोशल डिस्टन्सिंगची शिस्त पाळत नाही,' असे येथील केंद्रचालक दीपक कांबळे यांनी सांगितले. 

हार मानतील ते आयटीयन्स कसले; पाहा ते आता काय करतायेत

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची रेबीज लशीसाठी धावपळ 

आता पोस्टातून मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम 

केंद्र सरकारच्या 'सर्वांसाठी घरे' या अभियानांतर्गत ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. घरबसल्या ऑनलाइन अर्ज भरतो येतो. मात्र, अनेकांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाही. त्यामुळे ते महा- ई-सेवा केंद्र गाठतात. या केंद्रावर अर्ज भरणे व जमा करण्यासाठी सकाळपासून नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोनामुळे स्वतःहून सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. परंतु अर्ज भरण्याच्या आवेशात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाताना दिसत नाही. तसेच केंद्राबाहेर पुरेशी जागा नाही, मास्क आणि सॅनिटायझरची सुविधांचा अभाव आहे. महापालिकेच्या चिंचवडगावातील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागीय कार्यालयाबाहेरही अशा प्रकारे गर्दी दररोज पाहायला मिळत आहे. स्वाती शिंदे म्हणाल्या, ""अर्ज भरण्यासाठी सकाळी आले आहे. पण माझा नंबर लवकर आल्याने जास्त वेळ थांबण्याची वेळ आली नाही.'' 

अधिकृत नागरी सुविधा केंद्राबाहेर एजंट 
महापालिकेच्या अधिकृत नागरी सुविधा केंद्रात डीडी आणि अर्ज जमा करायचा आहे. परंतु अनेक केंद्रामध्ये गर्दी असल्याचे पाहून काही एजंटांनी केंद्राबाहेरच नागरिकांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

मी दहापासून अर्ज भरण्यासाठी आले आहे. गर्दी असल्याने तास दीडतास थांबावे लागले.
- लता जगताप, लाभार्थी 

केंद्रावर नागरिकांना व्यवस्थित माहिती दिली जात आहे. त्यांच्याकडून अधिकचे पैसे घेण्यात येत नाहीत. वारंवार सांगूनही नागरिकांकडून सामाजिक अंतर पाळले जात नाही. 
- दीपक कांबळे, केंद्रचालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowds at civic amenity centers at pimpri chinchwad