पाचवीपासून शाळांबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती 

पाचवीपासून शाळांबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती 

पिंपरी - पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शाळांबाबत राज्य सरकारच्या सूचना सोमवारी रात्री महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्याबाबतचा शहराचा आढावा घेऊन दोन-तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन झाल्यामुळे गेल्या वर्षी 22 मार्चपासून शाळा बंदच होत्या. मात्र, आता संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आल्यामुळे हळूहळू सर्व बाबतीत "अनलॉक' झाले आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन नववी व दहावीचे वर्ग आणि कनिष्ठ महाविद्यालये (अकरावी व बारावी) सुरू करण्याची सूचना नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने केली होती. त्यानुसार शहरातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग चार जानेवारीपासून सुरू झाले आहेत. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतिपत्र देणे आवश्‍यक आहे. त्यानुसार रोज घड्याळी तीन तास शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू आहेत. त्यांनाही विद्यार्थ्यांची फारशी उपस्थिती नसते. सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त हर्डीकर म्हणाले, ""पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून सूचना आलेल्या आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय दोन-तीन दिवसांत घेतला जाईल.'' 

संमतिपत्र आवश्‍यक 
नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यापाठोपाठ पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्याचे सूतोवाच सरकारने दिले आहेत. शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना शाळात पाठविण्याबाबत पालकांचे संमतिपत्र आवश्‍यक असेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com