पिंपरी : ‘पीएमपी’ बरखास्त करा; राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची साप्ताहिक सभा ऑनलाइन पद्धतीने बुधवारी झाली.
PCMC
PCMCSakal

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सहाशे बस नादुरुस्त असल्याने बंद आहेत. संचलन तूट म्हणून दरमहा पीएमपीला महापालिका रक्कम देत. मात्र, त्याप्रमाणात पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना सेवा मिळत नाही. त्यामुळे पीएमपीएमएल बरखास्त करावे, अशी मागणी महापालिका स्थायी समितीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी केली.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची साप्ताहिक सभा ऑनलाइन पद्धतीने बुधवारी झाली. समिती अध्यक्ष नितीन लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व अपक्ष असे १४ सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर, राजू बनसोडे, सुलक्षणा धर-शीलवंत व पौर्णिमा सोनवणे यांनी पीएमपी बरखास्त करण्याची मागणी केली. दरम्यान, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या पत्रानुसार सप्टेंबर महिन्यातील संचलन तूट भरून काढण्यासाठी १२ कोटी पीएमपीला देण्यास समितीने मंजुरी दिल्याने अध्यक्ष लांडगे यांनी सांगितले.

PCMC
पिंपरी: आरटीईच्या हजारो जागा रिक्त

संचलन तूट का?

तत्कालीन पुणे महापालिका परिवहन (पीएमटी) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन (पीसीएमटी) या संस्थांचे २००७ मध्ये विलीनीकरण करून पीएमपीएमएल स्वतंत्र परिवहन संस्थेची निर्मिती झाली. त्यासाठी दोन्ही संस्थांतील अधिकारी-कर्मचारीही वर्ग करण्यात आले. त्यावेळच्या करारानुसार पीएमपीच्या संचलन तुटीपैकी ६० टक्के रक्कम पुणे महापालिका व ४० टक्के रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिका करीत आहे. त्यानुसार बुधवारच्या स्थायी समिती सभेत सप्टेंबर महिन्याची संचलन तुटीची रक्कम देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.

बरखास्ती का?

पीएमपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यःस्थितीत बावीसशे बस आहेत. त्यातील सोळाशे बस सुरू आहेत. त्यातील ४० टक्के बस नादुरुस्त आहेत. करारानुसार ४० टक्के बस पिंपरी-चिंचवड शहरासाठी आहेत. मात्र, त्या प्रमाणात मिळत नाहीत. शिवाय, आपल्या म्हणजे पूर्वीच्या पीसीएमटी कर्मचाऱ्यांचीही अवहेलना होत आहे. त्यांच्याकडून शहरातील प्रवाशांना सुविधाच मिळत नसतील तर, पीसीएमटीच बरी होती. त्यामुळे पीएमपी बरखास्तीची मागणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे, असे राष्ट्रवादीचे सदस्य प्रवीण भालेकर यांनी सांगितले.

कामांसाठी २५ कोटी खर्चास मान्यता

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सांडापाणीवाहिन्या यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी एक कोटी २९ लाख, प्रभाग आठमधील रस्ते सुशोभीकरणासाठी ९२ लाख, भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे बीआरएस कॉरिडोरवरील शिंदेवस्ती येथे उड्डाणपूल बांधणीत अडथळे दूर करण्यासाठी १४ कोटी ८८, पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते काटे पाटील चौकापर्यंत उच्च क्षमता द्रुतगती मार्गाच्या क्षेत्रात जॉगिंग ट्रॅक वृक्षारोपण (लिनिअर अर्बन गार्डन) उद्यानासाठी ७१ लाख, प्रभाग दहामधील दवाखाना इमारत दुरुस्तीसाठी २५ लाख, संत तुकारामनगर व कासारवाडी परिसरात पाणीपुरवठा मजुरांसाठी ५६ लाख आदी खर्चास मान्यता देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com