कोरोनाला हरवलेले आजोबा म्हणतायेत, फक्त खाणारा पाहिजे...कोरोना लांबच पळतोय...

पीतांबर लोहार 
Wednesday, 9 September 2020

कोरोनावर मात केलेल्या 72 वर्षीय आजोबांचे मत; जम्बो फॅसिलिटी रुग्णालयात घेतलेत उपचार 

पिंपरी : "चहा, नाश्‍ता, जेवण सर्व वेळेवर मिळतंय, फक्त खाणारा पाहिजे. मग बघा, कोरोना तुमच्यापासून कसा लांब पळतो ते...' ही भावना आहे, कोरोनावर मात केलेल्या 72 वर्षीय आजोबांची. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयात त्यांच्यावर आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. बुधवारी (ता. 9) दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

 
शहर परिसरात रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातर्फे मगर स्टेडियम येथे 800 बेड क्षमतेचे जम्बो फॅसिलिटी रुग्णालय उभारले आहे. यात 600 ऑक्‍सिजन व 200 व्हेंटिलेटर बेड आहेत. दोन सप्टेंबरपासून येथे रुग्ण दाखल करण्यात आले. पहिल्याच दिवशी बारा रुग्ण दाखल झाले होते. त्यात पेठ पारगाव (ता. आंबेगाव) येथील 72 वर्षीय आजोबाही होते. सात दिवस उपचार केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालय कक्षाच्या दरवाजापर्यंत त्यांना डॉक्‍टर घेऊन आले.

लोणावळेकर अडकले दुहेरी कात्रीत; एकीकडे रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे...

हात जोडून त्यांनी डॉक्‍टरांसह सुरक्षारक्षक व बाऊन्सरचे आभार मानले. त्यानंतर खिशातून मोबाईल काढला. नंबर डायल केला आणि "मी बाहेर आलोय. तुम्ही या,' असे म्हणत मोबाईल बंद केला. त्यांच्याशी संवाद साधल्यावर कळले की, त्यांचे जावई एमआयडीसी सेक्‍टर 28 मध्ये राहतात. तेच त्यांना घ्यायला येणार आहेत. एका बाऊन्सरने खुर्ची आणून दिली. त्यावर आजोबा बसले. पिशवीतून शॉल व चादर बाहेर काढून त्यांची व्यवस्थित घडी करून पुन्हा ठेवून दिले आणि जावयाची वाट पाहू लागले. हीच संधी साधत त्यांच्याशी संवाद साधला.

 अरे बापरे! भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई

आजोबा म्हणाले... 
""सुरवातील सर्दी, खोकला, ताप होता. आमच्या डॉक्‍टरांनी तपासल्यावर कोरोना झाल्याचे कळले. त्यांनीच इथे पाठवले होते. चहा, नाश्‍ता, जेवण, गोळ्या वेळेवर मिळत होते. फक्त खाणारा पाहिजे. आता डॉक्‍टरांनी सोबत गोळ्या दिल्या आहेत. आठ दिवस झाले उपचार सुरू होते. आता बरं वाटतंय. फोनवर घरच्यांशी रोज बोलत होतो.'' 

भावाचं तोंड पहायचंय... 
रुग्णालयाबाहेर राजगुरुनगरची एक महिला व त्यांची मुलगी बसलेली होती. महिला म्हणाली, ""माझा भाऊ ऍडमिट होता. आज पहाटे तीनच्या सुमारास गेला. डॉक्‍टर म्हणतात, "डेडबॉडी घरी देणार नाही'. पण, आम्हाला त्याचं तोंड तरी बघायला मिळाले पाहिजे. म्हणून थांबलोय. पाहू देतील ना...'' बोलता बोलताच मायलेकींना हुंदके अनावर झाले. 

आमचं पेशंट व्हेंटीलेटर 
मोशीतील दोन महिला व एक तरुण रुग्णालयाच्या आवारात ओट्यावर बसले होते. "तुमचं कोणी पेशंट आहे का?' असे विचारल्यावर, "आम्हाला काही बोलायचे नाही,' असे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले. "काय झालं? काही अडचण आहे का? काही मदत हवी का?' असं म्हणताच, "आमचा भाऊ व्हेंटीलेटरवर आहे. काय होईल काय माहीत,' असे म्हणत एकीने हुंदका आवरला. "डॉक्‍टर माहिती देतात ना?' यावर दुसरी महिला व तरुण म्हणाला, "सांगतात. त्या गेटबाहेर टेबल टाकला आहे ना, तिथे माहिती देतात. पण, आम्हाला भावाला भेटायचं आहे. डॉक्‍टर भेटू देत नाहीत.' 

पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

दृष्टिक्षेपात जम्बो रुग्णालय 
एकूण रुग्ण : 349 
व्हेंटीलेटरवर : 30 
ऑक्‍सिजनवर : 319 
डॉक्‍टर : 80 
नर्स : 120 
(बुधवारी दुपारी बारापर्यंत) 

दृष्टिक्षेपात बेड 
एकूण बेड : 800 
ऑक्‍सिजन बेड : 600 
व्हेंटीलेटर बेड : 200 
उपलब्ध ऑक्‍सिजन बेड : 281 
उपलब्ध व्हेंटीलेटर बेड : 170 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The grandfather who was treated in 'Jumbo' says, you get food, you just want to eat