पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सोसायट्यांमधील निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्याच्या समस्येबाबत बैठक

Garbage
Garbage

मोशी - मोशी-चिखली हाउसिंग सोसायटी फेडरेशन व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची येथील गृहनिर्माण सोसायट्यांमधील निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्याच्या समस्येबाबत आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे व फेडरेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी (ता. 15)  बैठक झाली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोशी चिखली सोसायटी फेडरेशनच्या मागणीनुसार परिसरातील बांधकाम व्यवसायिकांनी महापालिका नियमानुसार येथील गृह प्रकल्पांमध्ये ओला कचरा जिरवण्याचे प्रकल्प उभारून दिले नाहीत. तसेच संबंधित यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकांवर ताबडतोब कारवाई करावी व हा कचरा उचलण्यात यावा अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. 

पॉइंटर -
* एकुण सोसायट्या : 467
* एकुण सदनिका : 30 हजार
* कचरा प्रकल्प असलेल्या सोसायट्या : फक्त 3
 रिव्हर सोसायटी
 स्वराज सोसायटी
 वूड्स विले फेज-2
* सध्या ओला कचरा उचलला जात आहे का : नाही.
* ह्या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च :  25 लाख रुपये. 

सोसायटीमध्ये निर्माण होणारा कचरा सोसायटीमध्येच प्रक्रिया करून जिरवण्याचा प्रकल्प ह्या बांधकाम प्रकल्पात केल्याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिकेने त्या बांधकाम प्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये असा नियम असताना कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प, किंवा मशिन्स नसणाऱ्या 99% गृहप्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. 
- संजीवन सांगळे, सचिव : मोशी चिखली गृहनिर्माण सोसायटी फेडरेशन. 

येथील बांधकाम व्यावसायिकांनी कोणत्याच सोसायटीमध्ये ह्यासाठी एक इंच पण जागा सोडलेली नाही. सर्व खुल्या जागा पार्किंग म्हणून विकल्या आहेत. या प्रकल्पाला जागा उपलब्ध करून देणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशीन उपलब्ध करून देणे हे महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक करणे अपेक्षित आहे.
- आण्णासाहेब पुंडे पाटिल, अध्यक्ष : शिव क्लासिक सोसायटी मोशी

तब्बल २ वर्षानंतर महापालिकेने दिले मानधन तरी, बचत गट चालक हवालदिल
 
मागील दहा दिवसा पासुन महापालिका कचरा उचलत नाही. दुर्गंधी व साथीचे आजरी पसरयण्याची भीती आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून कचरा व्यस्थापनसाठी सुविधा पुरविणेसाठी महापालिकाने पावले उचलावीत.
- धीरज सिंग, अध्यक्ष : नक्षत्र आय लँड सोसायटी, मोशी.

यंत्रणा सोसायटी मध्ये उपलब्ध नसल्याने पालिकेमार्फत कचरा उचलला जात नव्हता. आमदार महेश दादा लांडगे व  फेडरेशन सचिव संजीवन सांगळे यांनी मिटिंग लावल्यानंतर कचरा उचलण्यास सुरुवात केली गेलेली आहे. 
- सभासद : अमूल्यम सोसायटी डुडुळगाव, मोशी.

मागील सात दिवसापासून सोसायटीत पडलेला कचरा लवकरात लवकर उचलावा. अन्यथा महामारीच्या काळात आणखी एक आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. याला सर्वस्वी महापालिकाच जबाबदार असेल.
- रोनक पोखरणा, अध्यक्ष : व्हिजन कल्पवृक्ष फेज ०२, डुडुळगाव मोशी.

ज्या बांधकाम व्यावसायिकांनी येथील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये हे कचरा जिरविणारे प्रकल्प सुरु केले नाहीत त्या संबंधित बांधकाम व्यवसायिकांनी हे कचरा जिरविणारे प्रकल्प व यंत्रणा उभारुन ताबडतोब सुरू करून द्यावेत. तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कचरा प्रकल्प नसताना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना या बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेच कसे याचीही चौकशी करण्यात यावी व सोसायट्यांमधील साठलेला कचरा त्वरित उचलण्यात यावा. 
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा 

आमदार महेश लांडगे व महापालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार फेडरेशनने केलेल्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात आला आहे. ज्या सोसायट्यांमध्ये ओला कचरा साठलेला आहे तो उचलण्याचा संदर्भात कार्यवाही सुरु करण्यात येणार असून येत्या दोन महिन्यात ही कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. 

या संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास फेडरेशनच्या  पदाधिकाऱ्यांनी माझ्या कार्यालयात येऊन प्रत्यक्ष भेटावे  हे असे आवाहन करण्यात येत आहे. 
- राजेंद्र राणे, कार्यकारी अभियंता पिंपरी-चिंचवड महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com