...म्हणून पुण्यातील परप्रांतीयांना आकुर्डीत हलविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

परराज्यातील स्थलांतरित कामगारांची पाठवणी झाल्याने बहुतेक निवारा केंद्रे आता रिकामी होऊ लागली असतानाच पुण्यातील जवळपास 120 परप्रांतीयांना पिंपरी-चिंचवडमध्ये हलविण्यात आले.

पिंपरी : परराज्यातील स्थलांतरित कामगारांची पाठवणी झाल्याने बहुतेक निवारा केंद्रे आता रिकामी होऊ लागली असतानाच पुण्यातील जवळपास 120 परप्रांतीय लोकांना गुरुवारी (ता. 21) पिंपरी-चिंचवडमध्ये हलविण्यात आले. त्यामुळे सर्व निवारा केंद्रांमधील परप्रांतीय कामगारांची संख्या परत वाढून जवळपास 180 पर्यंत जाऊन पोचली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'अ' क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुर्गुडे म्हणाल्या, "माझ्या कार्यक्षेत्रातील निवारा केंद्रांवर स्थलांतरित मजूर, कामगारांची संख्या यापूर्वी जवळपास 104 इतकी होती. मात्र, त्यातील कर्नाटक, मध्य प्रदेश येथील लोक मूळगावी पाठविण्यात आले असून सध्या 19 लोक शिल्लक होते. परंतु, पुण्यामधून उत्तर प्रदेशातील सुमारे 120 लोकांना आकुर्डी येथील मनपा उर्दू विद्यालयात पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत ते पुढील प्रवासाला रवाना होण्याची शक्‍यता आहे.'' 

हेही वाचा - पीएमपी बससेवा सुरू करण्याबाबत झाला मोठा निर्णय

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'ब' क्षेत्रीय कार्यालयाच्या निवारा केंद्र बंद झाले असून, तेथील 67 स्थलांतरित मजूरांना मध्य प्रदेश, चाळीसगाव येथे बसने पाठविण्यात आले आहे. 'क' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत, नेहरूनगर येथील मनपा शाळेतील 95 टक्के स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यांना प्रशासनाकडून वाहन पास उपलब्ध करून देण्यात आले. 'ड' क्षेत्रीय कार्यालयाच्या निवारा केंद्रांवर 35 लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातील 21 मध्य प्रदेश आणि 9 उत्तर प्रदेशचे लोक होते. त्यांची रवानगी त्यांच्या गावी करण्यात आली.

हेही वाचा - Video : 'त्यांनी' गावी जाण्यासाठी 267 किलोमीटर पायपीट केली अन् पिंपरीत

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

'ई' क्षेत्रीय कार्यालयाच्या निवारा केंद्रावर यवतमाळ, कोल्हापूर येथील प्रत्येकी एकेक व्यक्ती असून, उर्वरीत 78 लोकांना रेल्वे, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे पाठविण्यात आले. तर काही लोकांचे नातेवाईक येऊन त्यांना घेऊन गेले. 'ह' क्षेत्रीय कार्यालयाच्या दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग विद्यालयात सुमारे 22 स्थलांतरित कामगारांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. मात्र, बहुतेक परप्रांतीय लोकांना रेल्वेने सोडण्यात आले असून, राज्यातील लोकांसाठी बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली. 

हेही वाचा - Video : 'या' यंत्रणेमुळे कोरोना चाचण्यांचा वेग दुपटीने वाढणार

निवारा केंद्रातील स्थलांतरित लोकांची आकडेवारी - 

  • आकुर्डी उर्दू मनपा शाळा - 139 
  • कमला नेहरू विद्यामंदिर, पिंपरीनगर - 22 
  • अण्णासाहेब मगर विद्यालय, पिंपळे सौदागर - 5 
  • हुतात्मा भगतसिंग विद्यालय - 1 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moved 120 migrants people from Pune to Akurdi