esakal | विस्कळीत पाण्याच्या गोंधळावरून सोमवारी महापालिकेत बैठक; नेमका दोष कोणाचा?
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

महावितरणचा फिडर शुक्रवारी (ता. 4) रात्री बंद पडला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतपुरवठा खंडित झाला. परिणामी अशुद्ध जलउपसा बंद झाला. त्यामुळे गुरुवार, शुक्रवार व शनिवारी, रविवारी सलग चार दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीक हैराण झाले.

विस्कळीत पाण्याच्या गोंधळावरून सोमवारी महापालिकेत बैठक; नेमका दोष कोणाचा?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महावितरणचा फिडर शुक्रवारी (ता. 4) रात्री बंद पडला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतपुरवठा खंडित झाला. परिणामी अशुद्ध जलउपसा बंद झाला. त्यामुळे गुरुवार, शुक्रवार व शनिवारी, रविवारी सलग चार दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीक हैराण झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे सांगून महापालिकेनेही हात झटकले आहेत. नागरीकांची पाण्याविना दैना झाली, यामागे दोष नेमका कोणाचा हा प्रश्‍न निर्माण झाला आहे याबाबत पाणीपुरवठा विभागाने सोमवारी (ता.7)सर्व अभियंत्याची बैठक बोलावली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 943 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जल उपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पंप हाऊस उभारले आहे. त्यातून वीस पंपाद्वारे अशुद्ध पाणी उचलून पाईपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्‍टर 22 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. शुध्द केलेले पाणी वेगवेगळ्या भागातील टाक्‍यांमध्ये पोचवून त्याद्वारे शहरात वितरित केले जाते.

कोरोनामुक्त झालेले नागरिक प्लाझ्मा दानासाठी पुढे येताहेत पण...

रावेत बंधारा येथून दररोज सरासरी 510 दशलक्ष लिटर अशुद्ध जल उपसा होतो. मात्र, समन्याय पद्धतीने सर्वांना समान पाणी मिळावे यासाठी, गेल्या 25 नोव्हेंबर पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय, गुरुवारी रावेत अशुद्ध जल उपसा केंद्र, निगडी जल शुद्धीकरण केंद्र व शहरातील काही ठिकाणच्या पाणी वितरण यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यात आली.

त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित झाला. आता विजपुरवठा खंडित झाल्याने अशुद्ध जल उपसा बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

पाणी जपून वापरा
शुक्रवारी (ता. 4) रात्री 11 वाजता फिडर नादुरुस्त झाल्याने, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथील विद्युतपुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग बंद झाले आहे. त्यामुळे, शहरातील ता.5 व रविवार ता.6 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. दुरुस्तीचे काम सुरु असून विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरावे असे पाणीपुरवठा विभागने सांगितले.

शनिवारीही (ता.5)सायंकाळी अर्धा तास वीजपुरवठा खंडीत झाला. याबाबत महावितरणाला दोष देत नाही. मात्र, या चुका पुन्हा होऊ नयेत. शेवटी काही काळ वीज बंद राहिली. वेळ तर गेलाच. पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाणी पुरवठा विभागतील अभियंत्याची बैठक सोमवारी आहे. भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जाईल.
- रामदास तांबे, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Edited By - Prashant Patil

loading image