वडगावमध्ये बुधवारी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

वडगाव शहरात बुधवारी ( ता.२३ ) माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत असल्याने एक दिवसाचा लाॅकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली.

वडगाव मावळ - वडगाव शहरात बुधवारी ( ता.२३ ) माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत असल्याने एक दिवसाचा लाॅकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी व कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्‍याची सुचना केली आहे. या मोहिमेतआमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात गृहभेटी देवून नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वडगाव नगरपंचायतीच्या वतीने शहरात बुधवारी ( ता.२३ ) प्रभावीपणे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात येणार आहे.

सव्वासात कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घ्यावा. मनात कोणताही संकोच न बाळगता आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून घ्यावी. वडगाव नगरपंचायत प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी सर्व प्रभागातील सर्व नगरसेवक व  नगरसेविका यांना शहर हद्दीतील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी २५ हजार सर्वेक्षण फाॅर्मचे वाटप करण्याचे काम सुरू केले आहे.

`त्याच तिकिटावर तोच खेळ करणे थांबवा`; आमदार सुनिल शेळकेंचा भाजपला टोला

जेणेकरून ही मोहीम शेवटच्या घटकांपर्यंत राबविता येईल. नागरिकांनी हे फाॅर्म भरून आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य सेवकांकडे  जमा करावेत. प्रत्यक्ष गृहभेट देणाऱ्या नगरपंचायतीचे पथक, आशा, आरोग्य सेविका, स्वयंसेवक यांना सहकार्य करुन ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, आरोग्य समिती सभापती राजेंद्र कुडे यांनी नागरिकांना केले आहे.

तब्बल २ वर्षानंतर महापालिकेने दिले मानधन तरी, बचत गट चालक हवालदिल

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My family my responsibility campaign on Wednesday in Wadgaon