मावळात दिवसभरात ८७ नवे पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

मावळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात ८७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात ८७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित तीन जणांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ३७ वर्षीय व माळवाडी येथील ६९ वर्षीय पुरुष आणि शेवती येथील ६९ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. 

मावळसाठी सहा केंद्रांना रुग्णवाहिका; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या चार हजार २९५ व मृतांची संख्या १३९ झाली आहे. तीन हजार ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी १६४ जणांना घरी सोडण्यात आले. मावळ तालुक्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, ते जवळपास ७९ टक्क्यांवर गेले आहे. मृतांचे प्रमाण मात्र, स्थिर असून ते शेकडा तीनच्या आसपास आहे. शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ८७ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ३१, तळेगाव दाभाडे येथील १९, कामशेत येथील पाच, वडगाव, कुसगाव बुद्रुक, सोमाटणे व वारू येथील प्रत्येकी तीन, चांदखेड, कान्हे, नवलाख उंब्रे व दारूंब्रे येथील प्रत्येकी दोन, तसेच परंदवडी, वराळे, ऊर्से, इंदोरी, कुसगाव पमा, साळूंब्रे, आढले खुर्द, शिवणे, वाकसई, येळसे, गोडुंब्रे व शेवती येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 49 जणांचा मृत्यू

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या चार हजार २९५ झाली. त्यात शहरी भागातील दोन हजार ५०४ आणि ग्रामीण भागातील एक हजार ७९१ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक एक हजार ३०५, लोणावळा येथे ९३८ व वडगाव येथे रुग्णसंख्या २६१ एवढी झाली आहे. आतापर्यंत १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन हजार ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी १६४ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ७७४ सक्रिय रुग्ण असून, त्यातील ५२८ लक्षणे असलेले व २४६ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ५२८ जणांमध्ये ४३३ जणांमध्ये सौम्य, तसेच ९१ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. चार जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ७७४ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 87 corona positive found in maval on 25 august 2020