
महापालिकेचा नागरवस्ती विकास योजना विभाग आणि लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याची शिफारस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१९ मध्ये केली होती.
पिंपरी - तुमचे वय १८ ते ३० वर्षांतील आहे, तुम्ही बेरोजगार आहात, स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी जागा हवी आहे, प्रशिक्षण हवे आहे, अन्य मूलभूत सुविधा हव्या आहेत, तर मग घाबरू नका... आता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या समस्या सुटणार आहेत. त्याही अगदी मोफत, मग, तुम्ही युवक असा अथवा युवती. हवी फक्त तुमची इच्छाशक्ती. कारण, तुमच्या रोजगारासाठी महापालिकेने आणला आहे ‘लाइट हाउस’ प्रकल्प.
बारामतीत डझनभर पिस्तुले जप्त; पिस्तुलांचं MP कनेक्शन आलं उजेडात!
महापालिकेचा नागरवस्ती विकास योजना विभाग आणि लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याची शिफारस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१९ मध्ये केली होती. महिला व बालकल्याण समितीने या प्रस्तावास डिसेंबर २०१९ मध्ये आणि स्थायी समिती सभेने जानेवारी २०२० मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. त्यातच साधारणतः आठ महिन्यांचा कालावधी गेला. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे ‘लाइट हाऊस’ प्रकल्पाला मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य
असा असेल प्रकल्प
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये जागांच्या उपलब्धतेनुसार ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील १८ ते ३० वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी मुलभूत सोयीसुविधा महापालिका विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये जागा, संगणक संच आदींचा समावेश आहे. यात सहभागी युवक-युवतींना लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशनतर्फे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व अनुषंगीक खर्च सीएसआर अर्थात सामाजिक दायित्व निधीतून केला जाणार आहे. पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील एका सभागृहात प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी आवश्यक सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार आहे. एक लाइट हाउस प्रकल्प किमान तीन वर्षे कालावधींचा असेल.
परीक्षेसाठी कोर्टानं मंजूर केला जामीन; कोंबड्या चोरल्याच्या गैरसमजातून केला होता जीवघेणा हल्ला
असा असेल प्रकल्प
काय - लाइट हाउस प्रकल्प
कशासाठी - रोजगार निर्मितीसाठी
कोणासाठी - १८ ते ३० वर्षांतील युवक-युवती
कसा - सीएसआर फंडातून मोफत
कुठे - सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी
कालावधी - किमान तीन वर्षे