ऑक्‍सिजनअभावी होताहेत पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांचे हाल

पीतांबर लोहार
Wednesday, 9 September 2020

कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे शहरासह मावळ, मुळशी, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यांसह अन्य जिल्ह्यातील रुग्णही येथे उपचारासाठी येत आहेत. त्यात गंभीर रुग्णांची संख्याही जास्त आहे. त्यांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असते. अशा परिस्थितीत रुग्णालयांकडून ऑक्‍सिजनची मागणी वाढली आहे.

पिंपरी - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. लॉकडाउन शिथिल झाल्याने उद्योग, व्यवसायही सुरू झाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय व औद्योगिक भागाकडून ऑक्‍सिजन सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, पुरवठा कमी होत असल्याने खासगी रुग्णालयांतील रुग्णांसाठी सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. याबाबत काही रुग्णालय व्यवस्थापकांनी जिल्हा प्रशासनाकडे गाऱ्हाणे मांडले आहे. मात्र, लिक्विड ऑक्‍सिजन (द्रवरूप प्राणवायू) टॅंक सुविधा असलेल्या खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांना पुरेसा ऑक्‍सिजन उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी 24 मृत्यू 

कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे शहरासह मावळ, मुळशी, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यांसह अन्य जिल्ह्यातील रुग्णही येथे उपचारासाठी येत आहेत. त्यात गंभीर रुग्णांची संख्याही जास्त आहे. त्यांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असते. अशा परिस्थितीत रुग्णालयांकडून ऑक्‍सिजनची मागणी वाढली आहे. तसेच, गेल्या महिन्यापासून लॉकडाउनचे नियम शिथिल झाले. उद्योग, व्यवसायही पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. गॅस वेल्डिंग व टूल्स कटिंगसाठी ऑक्‍सिजनची गरज भासते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडूनही मागणी वाढली आहे. मात्र, त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे.

मावळात दिवसभरात ७८ नवीन पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

उद्योगांना प्राधान्य
पुरवठादारांकडून उद्योग, व्यवसायांसाठी ऑक्‍सिजन पुरविण्याला प्राधान्य दिले जात असल्याने रुग्णालयांपुढे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यावर प्रशासनाने नियंत्रण आणायला हवे व सरकारच्या आदेशाचे पालन होण्यासाठी नियमित तपासणी करायला हवी, असे औंधमधील एका हॉस्पिटलच्या संचालकांनी सांगितले. 

एका रुग्णालयातील स्थिती
शहरातील ३० बेडचे एक रुग्णालय. २० बेड ऑक्‍सिजन सुविधा. १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर. यामुळे एका तासाला ऑक्‍सिजनचे सात सिलिंडर लागत आहेत. एका रुग्णाला दिवसाला सरासरी तीन सिलिंडर लागतात. 

पिंपरी-चिंचवडकरांनो महत्त्वाची बातमी; गुरुवारी राहणार पाणीपुरवठा बंद 

जिल्हा प्रशासन म्हणते...
गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात व वेळेत ऑक्‍सिजनचा पुरवठा करावा. ऑक्‍सिजन उत्पादक कंपन्या आणि सिलिंडर भरणाऱ्यांनी केवळ वैद्यकीय उपचारासाठीच सिलिंडर वितरित करावेत, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

सर्वच रुग्णालयांतून सध्या ऑक्‍सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, उत्पादकांनी एकूण उत्पादनाच्या ८० टक्के ऑक्‍सिजन रुग्णालयांसाठी राखीव ठेवावेत, असा सरकारचा आदेश आहे. आमच्याकडे लिक्विड टॅंक असल्याने त्यातून पाइपद्वारे ऑक्‍सिजन पुरविला जातो. त्यामुळे वायसीएमसह अन्य रुग्णालये व जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्‍सिजन पुरेसा उपलब्ध होत आहे. 
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients in Pimpri Chinchwad are suffering from lack of oxygen