पिंपरीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष; पॉझिटिव्हच्या संपर्कातील लोकांची होत नाही चाचणी

बाधित रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ : आरोग्य विभागाचे नियोजन ढासळले
Corona
CoronaTeam esakal

पिंपरी : कोरोनाबाधितांचा मार्चअखेर आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले. मात्र ट्रेसिंग फार कमी प्रमाणात होत आहे. शहरातील खासगी प्रयोगशाळांत कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. परंतू, त्यांच्याकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याने ट्रेसिंग करण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पाच ते सहा जणांची चाचणी होत नसल्याने ते इतरांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरात कोरोनाचा तीन आकडी पाढा सुरू झाला आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंगवर भर देण्याची गरज आहे.

Corona
पुणे जिल्ह्यात एक लाख सक्रिय कोरोना रुग्ण; दिवसभरात ९९ रुग्णांचा मृत्यू

दररोज दोन हजारावर पॉझिटिव्ह

शहरात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, दररोज १० हजारांवर चाचण्या होत आहेत. यातील किमान दोन हजार जण दररोज पॉझिटिव्ह येत आहेत. कोरोनाबाधितांचा वाढता ग्राफ लक्षात घेता आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण एका रुग्णामागे ८ असे करण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला पाहिजे. आता हे प्रमाण एका रुग्णामागे १५ केले पाहिजे, गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर बारीक नजर ठेवणे आवश्‍यक असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Corona
पुणे तिथे काय उणे! ज्यांच्या घरी चोरी केली त्यांच्याबरोबरच चोरटा गेला सहकुटुंब जेवायला

ट्रेसिंगकडे दुर्लक्ष

संत तुकाराम नगरमधील एका महिलेला कोरोना झाला आहे, पण तिने रूग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या घरातील एकाच दिवशी तब्बल ६ रुग्णांची नोंद झाल्याचे समजते. यापैकी दोन रुग्ण हे इतरांच्या संपर्कात आले; पण त्यांचे ट्रेसिंग वेळीच न झाल्याने कोरोना संसर्गात वाढ झाली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष केल्याने आणि माहिती लपविल्यानेसुद्धा या ठिकाणी कोरोना संसर्गात वाढ झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे ट्रेसिंगवर अधिक भर देण्याची गरज आहे. विशालनगरमधील एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला. या रुग्णाच्या संपर्कात २० ते २५ जण आले. पण, त्यापैकी सात ते आठ जणांचीच कोरोना चाचणी करण्यात आली. संपर्कात आलेल्या उर्वरित १० ते १२ जणांची चाचणीच करण्यात आली नसल्याचे समजते आहे. परिणामी, कोरोना संसर्गात वाढ होण्यास मदत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com