esakal | पिंपरी : कोव्हिशिल्ड ४८००, कोव्हॅक्सिनचे २०० डोस आज उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

पिंपरी : कोव्हिशिल्ड ४८००, कोव्हॅक्सिनचे २०० डोस आज उपलब्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेकडे कोव्हिशिल्डचे चार हजार ८०० व कोव्हॅक्सिनचे केवळ २०० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शनिवारी (ता. १७) १८ केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि केवळ दोनच केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. गरोदर महिला, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लस दिली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवली आहे. (pimpri corporation received 4800 doses covshield 200 doses covaxine)

कोव्हिशिल्ड लशीचे दोन हजार ४०० डोस १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी आहेत. मात्र, केवळ पहिला डोस दिला जाणार आहे. त्याची व्यवस्था सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे मेमोरियल हॉल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, अत्रे सभागृह संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड येथे केली आहे. दोन हजार ४०० डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना दिले जाणार आहेत.

हेही वाचा: 'रॉ' एजंटकडून फेसबुकवरुन मैत्री झालेल्या महिलेवर बलात्कार

पहिला व दुसरा डोस दिला जाणार असून, पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेले असावेत. त्याची व्यवस्था मोरे वस्ती शाळा क्रमांक ९२, ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, दीनदयाल शाळा संत तुकारामनगर पिंपरी, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, रहाटणी शाळा, पिंपळे निलख इंगोले शाळा, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर केली आहे. फ्रंटलाइन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कोव्हॅक्सिन लशीचे १०० डोस फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन केंद्रावर उपलब्ध आहेत. येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे.

हेही वाचा: शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनाही केवळ दुसरा डोस पिंपळे निलख इंगोले स्कूल केंद्रावर दिला जाणार आहे. येथेही १०० डोसच उपलब्ध असतील. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेले असावेत. सकाळी आठनंतर टोकन दिले जाईल. सकाळी १० ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे.

हेही वाचा: 2022 मध्ये TCS, Infosys, Wipro कंपन्यांत 1 लाख फ्रेशर्सना संधी

गरोदर महिला व विद्यार्थ्यांची व्यवस्था

गरोदर महिलांना सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे मेमोरिअल हॉल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर गरोदर मातांना लस दिली जाणार आहे. तसेच, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन जिजामाता रुग्णालयात पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी प्रत्येकी १०० डोस उपलब्ध आहेत. त्यांनी पुरावा म्हणून संबंधित विद्यापीठाचे पत्र, मुलाखत किंवा ऑफर पत्र, टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागाचे नामांकन पत्र सादर करणे आवश्‍यक आहे.

loading image