Pimpri: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची नागरिकांची मागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी

पिंपरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत. राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक खेड्यांपासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. पण, आज या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांच्या संपाविषयी शहरातील प्रवासी नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.

स्मिता सस्ते (अपंग, मोशी) : समाजातील अपंग, मूकबधिर नागरिकांना एसटी सवलतीची प्रवासी सेवा देते. एसटीच्या भरवशावर अपंग नोकरी धंदा करत असतात. आज संपाचा फायदा घेऊन पाचपटीने खासगी बसचालक लुटत आहेत. एसटी कर्मचारी इमानदार सेवक आहेत. त्यांच्या आर्थिक मागण्या पूर्ण कराव्यात.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

राजू सुतार (कामगार, रावेत) ः सरकारची ही हक्काची ही प्रवासी सेवा आहे. विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक यांना विश्‍वासाने इच्छित स्थळी पोचविणारी एसटीसारखी सेवा नाही. रातरणीचा एसटीचा प्रवास महिला प्रवाशांना खात्रीशीर वाटतो. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा तुटपुंजा पगार सरकारने वाढवावा.

सलीम सय्यद (ज्येष्ठ नागरिक, चिंचवड) ः सरकारने खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर एसटी तोट्यात गेली. ज्येष्ठ नागरिकांना खाजगीकारणांमध्ये सवलती मिळणार नाहीत. माझे वडील वाहक होते. ‘गाव तेथे एसटी’ या धोरणामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीत एसटीचा मोलाचा वाटा आहे. एसटीचे आता अपघात कमी आहेत.

हेही वाचा: Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा!

अरुणा पानशेट्टी (प्रवासी, चिखली प्राधिकरण) ः कऱ्हाड शहरातून मी पिंपरी-चिंचवड शहरात नातेवाइकांना आणि नोकरी करत असलेल्या माझ्या मुलाला भेटण्यासाठी मी एसटीने येते. एसटीचे चालक हे माझ्या भावासारखे आहेत. सरकारने त्यांचे पगार वाढवून त्यांची गरिबी हटवावी.’’

loading image
go to top