कसलीही सबब न देता व्यायामाला प्राधान्य द्या

Exercise
Exercise

पिंपरी - ‘जेवण, पाणी व श्वास घेणे जसे महत्त्वाचे आहे, तसे या तिन्ही गोष्टींना नियंत्रित करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. आंतरिक उर्जेला बाह्य ऊर्जेची कमतरता सहन होत नाही. त्यामुळे आंतरिक ऊर्जा कायम ठेवण्यासाठी शरीर सुदृढ असणे आवश्‍यक असून, त्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आपल्यातील ऊर्जेचा योग्य वापर करा. कसलीही सबब न देता व्यायामाला प्राधान्य द्या,’’ असा सल्ला पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यायाम केवळ शरीर सुदृढ ठेवत नाही तर मनही सुदृढ ठेवते. व्यायाम केल्याने शरीर दुखते असा काहींचा समज असतो; मात्र, त्याउलट परिस्थिती आहे. व्यायामाने दुखणे पळून जाते. दुखणे, व्याधी दूर होण्याने आनंद मिळतो, शरीरात ऊर्जा निर्माण होते. व्यायामाने स्मरण शक्ती, भूक वाढते, स्वभाव शांत राहतो, झोप व पचनक्षमता सुधारते, आकलन शक्ती वाढते.

स्वतःतील ऊर्जा ओळखा. तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडे मजबूत स्नायू व शरीर आहेत. मात्र, स्नायू मजबूत नसतात तर तुमचे मन मजबूत असते. पण या मनाच्या सदृढतेला शोधण्यासाठी तुम्हाला एक धेयवेडे हृदय हवे. स्वतःचे शरीर निरोगी असणे आवश्‍यक आहे. याला व्यायामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे इतर कामांना जसा वेळ देतो, त्याचप्रमाणे व्यायामासाठीही कसलीही सबब न देता वेळ द्यायलाच हवा, असेही कृष्ण प्रकाश यांनी नमूद केले. 

जिद्द व व्यायामाच्या जोरावर यश 
सायकलिंग, स्वामिंगकडे स्पर्धा म्हणून पहिले नाही. आवड व आनंद म्हणून सुरुवात केली. दिवसा वेळ न मिळाल्यास रात्रीच्या वेळीही सराव केला. बंदोबस्तावरून पुणे, धुळे, नांदेड याठिकाणाहून मुंबईला परतताना सायकलने आलो. मिळेल त्या वेळेत सराव व व्यायाम सुरू ठेवला. या जोरावरच फ्रान्समधील आयर्नमन, ऑस्ट्रेलियामधील अल्ट्रामॅन व अमेरिकेतील रेस अक्रॉस वेस्ट ऑफ अमेरिका या खडतर स्पर्धा कृष्ण प्रकाश यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी पूर्ण केल्या. 

आयुक्तांच्या टिप्स 

  • पहाटे तीन ते सकाळी आठ ही वेळ व्यायामासाठी पोषक 
  • रात्री कार्बोहायड्रेडचे सेवन टाळावे  
  • रात्रीच्या जागरणाने प्रतिकार शक्ती कमी होते
  • सायकलिंग सारखा व्यायाम रात्रीही करू शकता
  • त्यासाठी टॉर्च, सायकलला रिफ्लेक्‍टर, हेल्मेट असावेत
  • उत्तम आरोग्यासाठी आहार व व्यायाम दोन्ही महत्त्वाचे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com