
अपघातात बसचालक तसेच अन्य एक जण गंभीर झाला असून इतर आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्वांना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम व खोपोली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली एक्झिट जवळ खाजगी बसने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. आज (ता.२८) रोजी सकाळी ही घटना घडली. किशोर तुकाराम घोटकुळे (वय-५३), विठ्ठल दामोदर घोटकुळे (वय- ५४, डोंबिवली), सीताराम यादव (वय-३८, हैदराबाद), सर्जेराव कटारे (वय-३९, तळेगाव), नरसिंह छेगुरी (वय-४५), ललिता छेगुरी (वय-४०, चेंबूर,मुंबई), उमेश गायकवाड (वय-२२, कर्नाटक), रघुनाथ साठे (वय-३६, कर्नाटक) अशी जखमींची नावे आहेत.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबई कडे जाणारी ऑरेंज ट्रॅव्हल्सच्या भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने ट्रकला मागून जोराची धडक दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात 94 नवीन रुग्ण; बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या...
अपघातात बसचालक तसेच अन्य एक जण गंभीर झाला असून इतर आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्वांना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम व खोपोली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस, आयआरबी कंपनीचे कर्मचारी, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बस महामार्गावरून बाजूला केल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सध्या सुरळीत झाली आहे.