इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले सहा पॉझिटीव्ह; नऊ व्यक्तींचा झाला मृत्यू

CoronaVirus
CoronaVirus
Updated on

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 483 झाली आहे. आज 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 305 झाली आहे. सध्या एक हजार 424 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील सात अशा नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेले आणखी चार प्रवासी पॉझिटीव्ह आढळले असून एकूण संख्या सहा झाली आहे. 

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 754 झाली आहे. तर, शहराबाहेरील 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिंचवड (वय74) व महिला सांगवी (वय 55) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष चाकण (वय 60), जुन्नर (वय 58 व 65), अमरावती (वय 67), देहूरोड (वय 39), विश्रांतवाडी (वय 44) व महिला आळंदी (वय 60) येथील रहिवासी आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 267 प्रशावाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 156 जण नकारात्मक आले आहेत. सहा जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 26 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 

सध्या महापालिका रुग्णालयांत 640 रुग्ण उपचार घेत आहेत. 784 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 393 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 504 जणांची तपासणी करण्यात आली. आज 638 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 86 हजार 346 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

आज दोन हजार 133 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 687 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून दोन हजार 157 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 389 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

आजपर्यंत पाच लाख 47 हजार 710 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 49 हजार 838 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 46 हजार ग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com