अल्पवयीन वाहन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

अल्पवयीन वाहन चोरट्याला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

पिंपरी : अल्पवयीन वाहन चोरट्याला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार प्रकाश हरिदास पाटील (वय 23, रा. पाण्याच्या टाकीजवळ, कैलासनगर, पिंपरी) याला अटक केली आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' विषयावरून भाजप-शिवसेनेत रंगतोय सामना

पिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

अल्पवयीन चोरटा थेरगाव येथील एका मोठ्या रुग्णालयाजवळ थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन चोरट्याकडून तीन लाख रूपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. यामध्ये भोसरी पोलिस ठाण्यातील घरफोडीचा एक गुन्हा, तर वाकड ठाण्यातील वाहनचोरीचे दोन व पिंपरी, हिंजवडी, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला. उर्वरित पाच वाहनांबाबतचा तपास सुरू आहे. 

भामा आसखेडमधून पिंपरी-चिंचवडसाठी जलवाहिनी टाकण्याकरिता 162 कोटींचा निधी मंजूर

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक हरिष माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, बाबाजान इनामदार, बिभीषन कन्हेरकर, नितीन ढोरजे, दीपक भोसले, शाम बाबा, सचिन नरूटे, प्रशांत गिलबिले यांच्या पथकाने केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ten two wheelers seized from a thief in pimpri chinchwad