esakal | ड्रग्ज विक्रीप्रकरणी चाकणमध्ये पकडलेल्या आरोपींचा विमान प्रवास; मुंबई कनेक्शनची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रग्ज विक्रीप्रकरणी चाकणमध्ये पकडलेल्या आरोपींचा विमान प्रवास; मुंबई कनेक्शनची शक्यता
  • चाकणमध्ये पकडले वीस कोटींचे मेफेड्रॉन 

ड्रग्ज विक्रीप्रकरणी चाकणमध्ये पकडलेल्या आरोपींचा विमान प्रवास; मुंबई कनेक्शनची शक्यता

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने चाकण येथे वीस कोटी रुपये किमतीचे वीस किलो मेफेड्रॉन पकडले. हे ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जणांना अटक केली असून, यातील दोन आरोपी नोएडा येथून विमानाने पुण्यात आले होते. या मेफेड्रॉनचे मुंबई कनेक्‍शन असल्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पिंपरी-चिंचवड महापालिका शेतकऱ्यांसाठी बांधणार गहुंजे, शिवणेत बंधारा 

चेतन फक्कड दंडवते (वय 28, रा. मलठण, आंब्रेवस्ती, ता. शिरूर), आनंदगीर मधूगीर गोसावी (वय 25, रा. रुखईखेडा, ता. मुक्ताईनगर, जळगाव), अक्षय शिवाजी काळे (वय 25, रा. पाचर्णे मळा, ता. शिरूर, मूळ-नगर), संजीवकुमार बन्सी राऊत (वय 44, रा. बुकारोस्टील सिटी, झारखंड, सध्या रा. नोएडा, उत्तर प्रदेश) व तौसिफ हसन महम्मद तस्लिम (वय 31, रा. गंगोई, जि. मुजफ्फरनगर, बिहार; सध्या नोएडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध होणार 50 टक्के बेड; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय  

बुधवारी (ता. 7) काही जण चाकण-शिक्रापूर रस्त्याने मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवरील शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडी, धावरदरा येथील दशमेश पंजाबी ढाबा येथे सापळा रचला. मोटारीचा पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या मोटारीची तपासणी केली असता त्यातील ट्रॅव्हलिंग बॅग व पिशवीत वीस कोटी पाच लाख 23 हजार 100 रुपये किमतीचे वीस किलो मेफेड्रॉन सापडले. 

पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट

यातील आरोपी केमिकल डिस्ट्रीब्युटर या व्यवसायाशी निगडित आहेत. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर यातील संजीवकुमार राऊत आणि तौसिफ तस्लिम हे नोएडा येथून विमानाने पुण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पाचही आरोपी एकत्र आले व वीस किलो मेफेड्रोन ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन निघाले होते. त्याचवेळी अंमली पदार्थविरोधी पथकाने त्यांना अटक केली. 

मोठ्या रॅकेटची शक्‍यता 
या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याची शक्‍यता आहे. नेमका हा माल कुठे तयार झाला, कुठून आणला, कोठे घेऊन जाणार होते, आणखी किती जणांचा समावेश आहे. याविषयी सखोल तपास सुरू आहे. हा माल मोठ्या प्रमाणात सापडला असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता कृष्ण प्रकाश यांनी वर्तविली. 

उपनिरीक्षक निलंबित 
दोन आठवड्यांपूर्वी चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत 27 लाखांचे स्पेअर पार्ट घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला चाकूचा धाक दाखवून कंटेनर पळवून नेला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तीन जणांना गजाआड केले. या लुटमारीत चाकण पोलिस ठाण्यातील विक्रम पासलकर या उपनिरीक्षकाचीही सहभाग आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पासलकर पसार झाला. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी पासलकर याला निलंबित केले आहे. तसेच, अशाप्रकारे चुकीची कामे करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.