Voting Right : मतदानाचं वय २१वरून १८ वर्षे का करण्यात आलं ?

१९८०च्या दशकात दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये २ ते अडीच कोटींची वाढ होत असे. पण नव्या निर्णयामुळे ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.
Voting Right
Voting Right google

मुंबई : आजचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी खास आहे. जेवढा तरूण पिढीचा सहभाग अधिक तेवढी लोकशाही बळकट असे मानले जाते. त्यामुळे आजचा दिवस भारतीय लोकशाहीला आणखी बळ देणारा ठरला होता.

२८ मार्च १९८८ रोजी ६१वी घटना दुरुस्ती करून मतदानाच्या अधिकाराचे वय २१वरून १८ वर्षे करण्यात आले. त्यामुळे मतदारांच्या संख्येत खूप मोठी वाढ झाली. (Why was the voting age changed from 21 to 18 years? rajiv gandhi lowers age of voting right ) हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Voting Right
Investment Tips : भरपूर पैसे गुंतवूनही मिळत नाहीये पुरेसा नफा ? मग तुमचं काहीतरी चुकतंय

१९८०च्या दशकात दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये २ ते अडीच कोटींची वाढ होत असे. पण नव्या निर्णयामुळे ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.

१९८४ सालच्या निवडणुकीत मतदारांची संख्या ३७.४ कोटी इतकी होती. १९८९च्या निवडणुकीत ही संख्या ४४.७ कोटी इतकी झाली.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेस पक्षाबाबत मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. याचं फलित म्हणजे त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक बहुमत मिळालं.

एकूण ४०४ जागा एकट्या काँग्रेस पक्षाने जिंकल्या. राजीव गांधी हे वयाच्या चाळीशीत म्हणजेच सर्वांत कमी वयात पंतप्रधान पदाची शपथ घेणारे पहिले पंतप्रधान आहेत.

स्वत: तरूण असल्यामुळे आपण काँग्रेसकडे तरूण मतदारांना अधिकाधिक आकर्षित करू शकतो, असा विश्वास त्यांना वाटला होता. त्यामुळे त्यांनी २८ मार्च १९८८ रोजी संसदेत एक विधेयक संमत करून घेतले.

नव्याने संमत झालेल्या विधेयकानुसार मतदानाच्या अधिकाराचे किमान वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले. पण प्रत्यक्षात काँग्रेसचा हेतू साध्य झाला नाही. मतदानाचे वय कमी केल्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा या तरूण मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला.

Voting Right
Save Tax : उत्पन्नावर भरपूर कर वाचवायचा असेल तर ३१ मार्चपूर्वी ही कामे करायला विसरू नका

तरूण वर्गाच्या गरजा मोठ्या असतात. शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, रोजगार हे त्यांचे महत्त्वाचे प्रश्न असतात. त्यामुळे या प्रश्नांना राजकारणात फार महत्त्व दिले जाते. मात्र त्याचे फलित निवडणुकीत दिसत नव्हते.

ज्या तरूण वर्गाच्या नावे राजकारण केले जाते त्याचा प्रतिसाद हवा असेल तर जास्तीत जास्त तरुणांना मतदानाच्या प्रक्रियेत सामावून घेणे आवश्यक असल्याचे तत्कालीन राजकारण्यांना कळले होते.

त्यामुळे मतदानाच्या अधिकाराचे वय करण्यात आले. मात्र आज आपल्याकडील राजकीय स्थितीचा विचार करता तरूण मतदार मतदानासाठी फारसा उत्सुक नाही. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यास बाहेरगावी जाण्याकडे काहींचा कल असतो.

अनेक तरूण मतदार शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. अशा मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मतदानाचे वय कमी करून खरंच उपयोग झाला का प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com