बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. आमिर खानने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे अनेक चित्रपट हे प्रबोधन देणारे असतात. त्याच्या प्रत्येक भुमिकेत काही न काही वेगळेपणा असतो. तो नेहमीच त्याच्या अभिनयासाठी त्याचं 100 टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो. 'दंगल'मधील अभिनयासाठी आमिरने चक्क 28 किलो वजन वाढवलं होतं. तर गजनी चित्रपटात एका शर्टलेस सीनसाठी त्याने सिक्सपॅक बनवले होते.