

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांच्या मुलांनी पदार्पण केलं असून कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. आदिनाथ कोठारे, अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे, जुई भागवत, सखी गोखले, आशुतोष गोखले हे काही स्टार किड्स सध्या प्रसिद्ध आहेत. त्यातच आता दोन स्टार किड्सच्या पदार्पणासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत ते म्हणजे भरत यांची मुलं सुरभी आणि आरंभ. नुकत्याच एका मुलाखतीत भरत यांनी मुलांच्या करिअरवरच्या प्रश्नावर उत्तर दिलं.