भूषण प्रधानच्या मनातील ‘स्वप्नसुंदरी’ २४ जुलैला भेटीला येणार! उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

Swapnasundari Movie Teaser Out : अभिनेता भूषण प्रधानची मुख्य भूमिका असलेल्या स्वप्नसुंदरी सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. जाणून घेऊया या नव्या सिनेमाविषयी.
भूषण प्रधानच्या मनातील ‘स्वप्नसुंदरी’ २४ जुलैला भेटीला येणार! उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित
Updated on

Entertainment News : रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रेक्षकांसाठी एक नवीकोरी, रंजक आणि कौटुंबिक मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहेत. लग्न, योग्य जोडीदाराचा शोध आणि त्याभोवती घडणाऱ्या मजेशीर घटनांवर आधारित ‘स्वप्नसुंदरी’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये मराठीतील चॉकलेट बॉय अभिनेता भूषण प्रधान एका फ्रेश भूमिकेत पाहायला मिळत असून, तो ‘राघव’ची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री सायली पाटील ‘मानसी’च्या भूमिकेत झळकत असून, या दोघांची ताजी जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com