
Latest News : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे क्रिकेट फॅन्सचं लाडकं कपल. आदर्श बायको म्हणून अनुष्काला अनेकजण नावाजतात. ती कायमच विराटला मॅचदरम्यान सपोर्ट करण्यातही हजर असते. कधीकधी नेटकरी विराटच्या वाईट परफॉर्मन्सचं खापर तिच्या डोक्यावर फोडतात पण अनुष्का या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करताना दिसते. नुकतीच तिने दुबई मध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमी फायनल मॅचला हजेरी लावली. त्यावेळेचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.