VIDEO: दुबईत भर कॉन्सर्टमध्ये चक्क स्टेजवर नखं कापली; अरिजित सिंगचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "भावा ही कामं घरी कर!"

Arijit Singh: अरिजितचा दुबईतील कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात अरिजित हा भर कॉन्सर्टमध्ये चक्क स्टेजवर नखं कापताना दिसत आहे.
Arijit Singh
Arijit Singhesakal

Arijit Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंग (Arijit Singh) हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. अरिजितचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या कॉन्सर्टला प्रेक्षक गर्दी करतात. अशातच अरिजितचा दुबईतील कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात अरिजित हा भर कॉन्सर्टमध्ये चक्क स्टेजवर नखं कापताना दिसत आहे.

भर कॉन्सर्टमध्ये अरिजितनं कापली नखं

अरिजित सिंगचा नुकतेच दुबईत एक कॉन्सर्ट झाले, ज्यामध्ये पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खाननेही हजेरी लावली होती. यावेळी अरिजितनं त्याची अनेक प्रसिद्ध गाणी गायली आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता या कॉन्सर्टमधील अरिजितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अरिजित हा समोर हजारो प्रेक्षक असताना स्टेजवर नखे कापताना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अरिजित सिंगचा कॉन्सर्टमधील व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं व्हायरल व्हिडीओला कमेंट केली, "हे खूप अनप्रोफेशनल आहे." तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, "भावा ही कामं घरी कर!"

पाहा व्हिडीओ:

अरिजितचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अरिजित हा दुचाकीवर बायकोसोबत मतदान करण्यासाठी गेला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी अरिजितच्या साधेपणाचं कौतुक केलं. पण काहींनी त्याला हेल्मेट न घातल्यामुळे ट्रोल देखील केलं आहे.

Arijit Singh
Arijit Singh On Pasoori Nu: 'म्हणून मी पसुरी गाणं गायलं', ट्रोलिंगनंतर अरिजितनं सांगितलं खरं कारण..

अरिजितच्या या गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती

अरिजितनं अनेक हिट गाणी गायली आहे. त्यामधील 'केसरिया', 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'चन्ना मेरेया' या अरिजितच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सध्या अरिजित हा त्याच्या अमर सिंग चमकिला या चित्रपटातील विदा करो या गाण्यामुळे चर्चेत आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

Arijit Singh
Arijit Singh Viral Video: 'कोण म्हणेल याची संपत्ती 7 मिलियन'! अरिजित स्कूटरवर निघाला किराणा घ्यायला..व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com