८ वर्ष लिव्ह इन, ४ मुलांचा बाप; अर्जुन रामपाल दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, असा पार पडला विवाहसोहळा

ARJUN RAMPAL GET MARRIED AT AGE 53: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याने वयाच्या ५३ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधलीये.
ARJUN RAMPAL SECOND WEDDING

ARJUN RAMPAL SECOND WEDDING

ESAKAL

Updated on: 

अनेक बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता अर्जुन रामपाल याने नुकतंच दुसरं लग्न केलंय ज्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. अर्जुन नुकताच 'धुरंधर' या चित्रपटात दिसला होता. आता त्याच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिलाय. मी लग्न करणार नाही असं म्हणणारा अर्जुन अखेर लग्नबंधनात अडकलाय. त्याने त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लग्न केलंय. उत्तर गोव्यातील म्हापसा येथील उपनिबंधक कार्यालयात अतिशय मोजक्या आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये हा नोंदणीकृत विवाह सोहळा पार पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com