Entertainment News: फोटोत दिसणारी 'ही' क्युट मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; सिनेसृष्टी सोडून आता रमलीये संसारात

Athiya Shetty: सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीये ती एका चिमुरडीच्या फोटोची. फोटोमधील ही क्युट मुलगी आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
Athiya Shetty
Athiya Shettyesakal

Athiya Shetty: कलाकारांच्या प्रोफेशनल लाईफच्या जोडीनेच त्यांची पर्सनल लाईफ सुद्धा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असते. सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीये ती एका चिमुरडीच्या फोटोची. ब्लॅक व्हाइट फोटोमध्ये ओरडताना दिसणारी ही चिमुरडी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आहे.

काही दिवसांपूर्वीच अथियाने तिच्या सोशल मीडिया पेजवर तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला आणि त्याला 'क्युट बट स्कॉर्पियो' असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या क्यूटनेसचं कौतुक केलं. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तर अथियाचा भाऊ अहानने केलेल्या कमेंटने. अथियाचा धाकटा भाऊ अहानने "गेली 28 वर्षं मी या व्यक्तीचा सामना करतोय" असं म्हणत आथियाची खिल्ली उडवली यावर अथियाने "I am dying...hahhahaha" अशी कमेंट केलीये.

तीनच सिनेमांनंतर सिनेसृष्टीला रामराम?

हिरो या सिनेमातून अथियाने 2015 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सूरज पंचोलीसोबत तिने या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर तिने फक्त आणखी 2 सिनेमांमध्ये काम केलं आणि सिनेसृष्टीला रामराम केला. 'हिरो' सिनेमानंतर अथिया 'मुबारका' आणि 'मोतीचुर चकनाचूर' या सिनेमात दिसली होती. सध्या ती सिनेमात काम करत नसली तरीही सोशल मीडियावर अजूनही तिची क्रेझ कायम आहे. सोशल मीडियावरील टीचर ग्लॅमरस फोटोज कायमच चर्चेत असतात.

क्रिकेटपटूशी थाटला संसार

अथियाने भारतीय क्रिकेटर के एल राहुलशी 23 जानेवारी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली. त्या आधी बराच काळ ते दोघे डेट करत होते. खंडाळामध्ये असलेल्या शेट्टी कुटूंबाच्या फार्महाऊसवर या दोघांचं लग्न मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं.

Athiya Shetty
Athiya Shetty: बायको असावी अशी! के एल राहुलची अथिया शेट्टी कडून पाठराखण; 'स्ट्रिप क्लब' प्रकरणावर भडकली!

प्रेग्नेंसीची चर्चा आणि अथियाची पोस्ट

काहीच दिवसांपूर्वी अथिया प्रेग्नेंट असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती पण याबाबत अथिया आणि के एल राहुलने अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलं नाहीये. एका रिऍलिटी शोमध्ये सुनील शेट्टी यांनी "जेव्हा मी आजोबा बनेन तेव्हा तसं चालून दाखवेन" असं म्हंटलं होतं त्यावरून अथिया प्रेग्नेंट असल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com