Ravi Kishan : अभिनेते रवी किशन यांना न्यायालयाचा दिलासा; महिलेने केली होती डीएनए चाचणीची मागणी

Ravi Kishan
Ravi KishanInstagram

मुंबई : अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांना दिंडोशी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. २५ वर्षीय महिलेने रवी किशन यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने तिची मागणी फेटाळून लावली.

मुंबईतील रहिवासी असलेल्या अपर्णा सोनी यांनी रवी किशन यांच्यापासून त्यांना शिनोवा नावाची मुलगी असल्याचा दावा केला होता; मात्र रवी किशन यांनी हा दावा फेटाळून लावत त्यांचा अपर्णा सोनी यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते.

रवी किशन आणि अपर्णा सोनी चांगले मित्र आहेत, दोघांनी चित्रपटसृष्टीत एकत्र काम केले आहे. पण, दोघे कधीच रिलेशनशिपमध्ये नसल्याचे रवी किशन यांचे वकील अमित मेहता यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे अपर्णाच्या वतीने अॅड. अशोक सरोगी यांनी युक्तिवाद करताना डीएनए चाचणीची मागणी केली होती.

Ravi Kishan
Manoj Jarange: विधानसभेला सर्व 288 जागांवर उमेदवार देणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

याबाबतचा दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता. २६) अपर्णा सोनी आणि रवी किशन यांच्यात संबंध असल्याचा पुरावा नसल्याचे स्पष्ट करताना डीएनए तपासणीची मागणी फेटाळून लावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com