Deepika Padukone: दीपिकाचा ऑस्करकडून सन्मान ! रणवीरने केलं बायकोचं कौतुक

Deepika Padukone: ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया पेज ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने दीपिकाचा बाजीराव मस्तानी सिनेमातील गाजलेल्या गाण्यावरील डान्स परफॉर्मन्स 'दिवानी मस्तानी'ची झलक इंस्टाग्रामवर शेअर केलीये.
रणवीरने केलं बायकोचं कौतुक
deepika Padukone and Ranveer Singhesakal

Deepika Padukone: बॉलिवूडच्या सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे तितक्याच वेगळ्या आणि सशक्त भूमिका साकारत दीपिकाने (Deepika Padukone) कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. दीपिकाचे अनेक सिनेमे यशस्वी झाले पण आजही ज्या सिनेमातील अभिनयामुळे प्रेक्षक तिचं कौतुक करतात तो सिनेमा म्हणजे २०१५ साली रिलीज झालेला बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani) हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित सिनेमा. सिनेमा जरी काही कारणांमुळे वादग्रस्त ठरला तरीही त्यातील दीपिकाच्या अभिनयाने आणि नृत्यकौशल्याने तिला कायमची 'मस्तानी' ही ओळख मिळवून दिली. या भूमिकेने तिला अनेक पुरस्कारसुद्धा मिळवून दिले.

आणि आता दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया पेज ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने दीपिकाचा बाजीराव मस्तानी सिनेमातील गाजलेल्या गाण्यावरील डान्स परफॉर्मन्स 'दिवानी मस्तानी'ची झलक इंस्टाग्रामवर शेअर केलीये. हे गाणं गायिका श्रेया घोषालने गायलं होतं. या दोघींना व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये क्रेडिट देत ऑस्करच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर दीपिकाचा नवरा अभिनेता रणवीर सिंगने "Mesmeric!" म्हणजेच 'मंत्रमुग्ध' अशी कमेंट करत बायकोचं कौतुक केलं. तर श्रेयाने सुद्धा या पोस्टवर कमेंट करत ऑस्कर संस्थेचे आभार मानले.

रणवीरने केलं बायकोचं कौतुक
Deepika Padukone: अनंत अंबानी- राधिकाच्या 'प्री वेडिंग' फंक्शनमध्ये 'मॉम टू बी' दीपिकाचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

लवकरच दीपिका आणि रणवीर एकत्र काम करणार असून दिग्दर्शित रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन सिनेमात ती दिसणार आहे. तर अभिनेता प्रभासबरोबर ती कल्की २८९८ एडी या सिनेमात काम करतेय. तसेच दीपिका प्रेग्नेंट असून लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे त्यामुळे तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com