देऊळ बंद २ मधील स्वामी समर्थांची झलक, यंदा स्वामींच्या भूमिकेत कोण? फोटो पाहताच नेटकऱ्यांना झाला आनंद

SWAMI SAMARTH’S FIRST LOOK FROM DEOOL BAND 2 OUT: ‘देऊळ बंद’ या गाजलेल्या मराठी सिनेमाचा सिक्वेल ‘देऊळ बंद 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सिनेमातील स्वामी समर्थांच्या भूमिकेबाबत मोठी माहिती दिली आहे.
 DEOOL BAND 2

DEOOL BAND 2

esakal

Updated on

DEOOL BAND 2: अध्यात्म आणि विज्ञान यांच्या सांगड घालणारा 'देऊळ बंद' या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. या सिनेमात स्वामी समर्थ महाराज आणि विज्ञान यांच्याभोवती फिरणाऱ्या कथेला प्रेक्षकांनी पसंती मिळाली होती. या सिनेमात स्वामी समर्थांची भूमिका मोहन जोशी यांची साकारली होती. दरम्यान आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com