Dharmendra’s Health Improves:
esakal
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमध्ये आता हळूहळू सुधारणा होताना पहायला मिळताय. त्यांना 10 नोव्हेंबर रोजी तब्येतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 12 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. आता त्यांच्यावर त्याच्या निवासस्थानी उपचार सुरु आहे. या सगळ्यात हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल खास अपडेट दिलीय.