Do Aur Do Pyaar And LSD-2 BO Collection Day 1: ‘दो और दो प्यार’ आणि ‘एलएसडी 2’ ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात; ओपनिंग-डेला केली एवढी कमाई

शुक्रवारी (19 एप्रिल) 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar) आणि 'एलएसडी-2' (LSD) म्हणजेच लव्ह सेक्स और धोका-2 (Love Sex Aur Dhokha-2) हे चित्रपट रिलीज झाले. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात झाली आहे.
Do Aur Do Pyaar And LSD-2 BO Collection Day 1
Do Aur Do Pyaar And LSD-2 BO Collection Day 1esakal

Do Aur Do Pyaar And LSD-2 BO Collection Day 1: गेल्या काही दिवसांपासून विविष विषयांवर आधारित असणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ हे दोन बिग बजेट चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. पण या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. आता शुक्रवारी (19 एप्रिल) 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar) आणि 'एलएसडी-2' (LSD) म्हणजेच लव्ह सेक्स और धोका-2 (Love Sex Aur Dhokha-2) हे चित्रपट रिलीज झाले. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...

'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar Box Office Collection)

शिर्षा गुहा ठाकुरता दिग्दर्शित 'दो और दो प्यार या चित्रपटामध्ये विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं कथानक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला 55 लाखांचा कमाई केली आहे.

'एलएसडी-2' (LSD Box Office Collection)

दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित आणि एकता कपूर निर्मित 'एलएसडी-2' (LSD 2) हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात मौनी रॉय, तुषार कपूर, परितोष तिवारी, अभिनव सिंग आणि बोनिता राजपुरोहित यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची देखील बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात झाली आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला 15 लाखांची कमाई केली आहे.

Do Aur Do Pyaar And LSD-2 BO Collection Day 1
Do Aur Do Pyaar Review: पती-पत्नीच्या नात्‍यामधील गुंतागुंतीवर बेतलेली कथा; कसा आहे 'दो और दो प्यार'?

'एलएसडी-2' लव्ह सेक्स और धोका-2 आणि 'दो और दो प्यार' या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता वीकेंडला या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com