Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई विरोधात लुकआउट नोटीस केली जारी

Salman Khan House Firing Case: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या विरोधात शुक्रवारी लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी करण्यात आले आहे.
Salman Khan House Firing Case
Salman Khan House Firing CaseEsakal

अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याविरुद्ध लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी केले आहे. या प्रकरणात अनमोल आणि लॉरेन्सची नावे वॉन्टेड आरोपी म्हणून ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.

हल्ल्याच्या काही दिवसांनंतर मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन आरोपींव्यतिरिक्त, पोलिसांनी सोनूकुमार बिश्नोई आणि अनुजकुमार थापन या दोन आरोपींना अटक केली होती, ज्यांनी अभिनेत्याचे निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबारात वापरलेली स्फोटके वापरली होती उपलब्ध करून दिली होती.

न्यायालयासमोर त्यांची कोठडी मागताना पोलिसांनी सांगितले की, सागर पाल आणि विकी गुप्ता या पहिल्या दोन आरोपींच्या कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी बिश्नोई आणि थापनचा शोध घेतला. तो पनवेल येथे पाल आणि गुप्ता यांना बंदुक देण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Salman Khan House Firing Case
Ravi Kishan : अभिनेते रवी किशन यांना न्यायालयाचा दिलासा; महिलेने केली होती डीएनए चाचणीची मागणी

या प्रकरणी अधिक माहिती देताना मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात पोलीस तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेऊ शकतात, जो सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचा विचारही पोलीस करत आहेत.

Salman Khan House Firing Case
Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम अभिनेते गुरुचरण सिंह बेपत्ता; वडील म्हणाले...

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली असून तपासात त्याचा सहभागही समोर आला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी एलओसी जारी केली आहे. या प्रकरणात अनमोल आणि लॉरेन्स बिश्नोई यांना वॉन्टेड आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सांगण्यावरून दोन जणांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर पाच राऊंड गोळीबार केला.

Salman Khan House Firing Case
Chinmay Mandlekar: "महाराष्ट्रामधील मुलांच्या डीएनएमध्ये तीन नावं असतात..."; चिन्मय मांडलेकरचं भाषण ऐकलंत का?

1998 मध्ये राजस्थानमधील बिश्नोई समाजाने पवित्र मानल्या जाणाऱ्या काळवीटाची शिकार केल्यापासून अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आहे. गेल्या काही वर्षांत बिश्नोईने अभिनेत्याला धमक्या दिल्या आहेत आणि या घटनेबद्दल माफी मागायला सांगितली आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com