
Latest Marathi Movie Review : प्रेम, जिव्हाळा, मैत्री, आशा-निराशा, राग-गोडवा, रुसवे-फुगवे.. अशा एकूणच कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित असलेला तसेच मराठी मातीतील गोडवा जपणारा चित्रपट म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘फसक्लास दाभाडे’. खरं तर कौटुंबिक विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात हेमंतचा चांगलाच हातखंडा आहे. आता त्याचा हा चित्रपटातदेखील त्याच पंक्तीत बसणारा असला तरी समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर मनोरंजनाच्या माध्यमातून भाष्य करणारा आहे.