VIDEO: पापाराझीला पाहताच ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला; म्हणाला, 'ओय! इसे वापस रखो...'

Jr NTR: नुकताच ज्युनियर एनटीआर हा मुंबईत स्पॉट झाला. यावेळी पापाराझीला बघितल्यानंतर ज्युनियर एनटीआर भडकला.
 Jr NTR
Jr NTResakal

Jr NTR: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरचा (Jr NTR) चाहता वर्ग मोठा आहे. सध्या ज्युनियर एनटीआर हा त्याच्या त 'वॉर 2' (War 2) या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच ज्युनियर एनटीआर हा मुंबईत स्पॉट झाला. यावेळी ज्युनियर एनटीआरचे फोटो काढण्यासाठी पापाराझींनी गर्दी केली. पण पापाराझीला बघितल्यानंतर ज्युनियर एनटीआर भडकला.

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ज्युनियर एनटीआर फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला एक बॉडीगार्ड देखील दिसत आहेत. ज्युनियर हॉटेलच्या गेटवर पोहोचताच पापाराझी त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून स्टारला राग येतो आणि ओरडतो, 'ओय! इसे वापस रखो...'

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

ज्युनियर एनटीआरच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानी कमेंट केली, "जाऊ द्या त्यांना, ते स्टार असण्यासोबतच माणूस देखील आहेत." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "स्टार्सचं देखील वैयक्तिक आयुष्य असतं, त्यांना त्रास देऊ नका"

पाहा व्हिडीओ:

कधी रिलीज होणार वॉर-2?

'वॉर 2' हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी केले आहे. या चित्रपटाची कथा आदित्य चोप्रा यांनी लिहिली असून तो या चित्रपटाचा निर्माता देखील आहे. ज्युनियर एनटीआरसोबत या चित्रपटात हृतिक रोशन देखील काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी 'वॉर 2' या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 Jr NTR
War 2: 'वॉर-2' च्या सेटवरील फोटो लीक; हृतिक आणि ज्युनिअर एनटीआरच्या लूकनं वेधलं लक्ष

ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'वॉर 2' व्यतिरिक्त ज्युनिअर एनटीआर हा 'देवरा' या चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज, श्रीकांत हे कलाकार देखील काम करणार आहेत.

 Jr NTR
Devara Teaser: रक्तात मिसळलेला 'लाल समुद्र' अन् तो... Jr. NTR च्या देवराचा थरारक टीझर बघाच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com