Konkona Sen Sharma: कोंकणा सेन शर्मा 'या' अभिनेत्याला करतीये डेट? अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं ट्वीट व्हायरल

Konkona Sen Sharma: कोंकणा ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या डेटिंगच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
Konkona Sen Sharma and Amol Parashar
Konkona Sen Sharma and Amol Parasharesakal

Konkona Sen Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. कोंकणाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करतात. कोंकणा ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या डेटिंगच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. कोंकणाचं नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे? याबद्दल जाणून घेऊयात..

अमोलसोबत जोडलं जातंय कोंकणाचं नाव

अभिनेता अमोल पराशरला कोंकणा ही गुपचूप डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. अशातच आता कोंकणाचा एक्स पती रणवीर शौरीनं एक ट्वीट शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

ट्वीट व्हायरल

नुकतेच एक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, "कोंकणा सेन शर्माने रणवीर शौरीला सोडून सेक्युलर अमोल पराशरला डेट करण्याचा सर्वोत्तम निर्णय घेतला आहे." या ट्वीटला रणवीरनं रिप्लाय दिला, "मी सहमत आहे." रणवीरचं हे ट्वीट पाहिल्यानंतर अनेकजण असा अंदाज लावत आहेत की, रणवीरनं अमोल

Konkona Sen Sharma and Amol Parashar
Konkana Sen Sharma: 'हिंसा अन् इंटिमेट सीन दाखवण्यामागे तुमचा उद्देश काय हे तर कळायला नको का?'

कोंकणाचे चित्रपट

'पेज 3' आणि 'वेक अप सिड' या चित्रपटांमधील कोंकणाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच तिची किलर सूप ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झाली. लवकरच कोंकणा 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सरदार उधम' या चित्रपटातील अमोल पराशरच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच त्याच्या ट्रिपलिंग या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Konkona Sen Sharma and Amol Parashar
Konkona Sen Sharma: लग्नाआधी प्रेग्नंट, मग घटस्फोट आणि राष्ट्रीय पुरस्कार.. कोण आहे कोंकणा सेन शर्मा?

कोंकणानं  2010 मध्ये रणवीरसोबत लग्न केलं. त्यानंतर 2020 मध्ये ते दोघे विभक्त झाले. अमोल आणि कोंकणाच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे पण या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com