'Punha ShivajiRaje Bhosale' Trailer
esakal
सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित चित्रपट 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत असताना या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. एका दिमाखदार कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा चित्रपट ट्रलर प्रदर्शन सोहळा पार पडला. यावेळी अनेक कलाकार सुद्धा उपस्थित होते.