Meta Gala 2025: काय असतो मेट गाला? 'या' एकमेव व्यक्तीकडे आहे 1995 पासून नियोजनाचा मान

What Is The History And Purpose Of The Met Gala event: मेट गाला 2025 या भव्य फॅशन सोहळ्याचं नियोजन 1995 पासून वोग मासिकाच्या एडिटर-इन-चीफच्याच हाती आहे.
What is Met Gala
What is Met Galasakal
Updated on

Everything You Need To Know About Met Gala: दरवर्षी आपल्याला सोशल मीडियावर बरेच बॉलीवूड आणि हॉलीवूडचे कलाकार भव्य आणि आगळ्यावेगळ्या प्रकारच्या पण डिझाईनर आणि ठराविक थीमशी मिळत्याजुळत्या कपड्यांमध्ये एका भव्य सोहळ्यात सहभागी होताना दिसतात. हा कार्यक्रम साधासुधा नसून मेट गाला असतो. जिथे अनेक सेलिब्रिटी अतिशय आकर्षक वेशभूषा करून आलेले दिसतात. पण हा मेट गाला नक्की आहे तरी काय हे पुढे जाणून घेऊया.

जगातल्या सगळ्यात जास्त चर्चा होणाऱ्या फॅशन इव्हेंट्समध्ये मेट गालाचा नंबर अगदी वरचा आहे. या भव्य सोहळ्याची सुरुवात 1948 मध्ये झाली आणि आज तो ग्लोबल स्टायलिश सेलिब्रिटींसाठी एक मोठं व्यासपीठ बनला आहे. न्यूयॉर्कमधल्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये दरवर्षी हा कार्यक्रम रंगतो. हे म्युझियम केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.

What is Met Gala
Met Gala 2025 : Met Gala वर झळकलं 'मेड इन इंडिया' कार्पेट, सलग तिसऱ्यांदा मिळाला सन्मान, काय आहे केरळ कनेक्शन?

काय असतो मेट गाला?

दरवर्षी न्यूयॉर्कमध्ये एक असा सोहळा पार पडतो, जिथं फॅशनच्या दुनियेतील सगळे नजर लागून पाहतात, तो म्हणजे मेट गाला. मेट गाला म्हणजे फक्त रेड कार्पेट, चकमकणारे कपडे, झगमगाट आणि प्रसिद्ध सेलेब्रिटीच नाहीत तर एक चॅरिटी इव्हेंट आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून हा सोहळा सुरु होतो. याला “फॅशनचा ऑस्कर” असंही म्हटलं जातं. इथे जगातील सगळ्यात मोठे कलाकार, डिझायनर्स, आणि सेलेब्रिटी उपस्थित राहतात.

कॉस्ट्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्याच्या हेतूने हा शो घेतला जातो. दरवर्षी या कार्यक्रमात जगभरातून प्रसिद्ध सेलिब्रिटी, कलाकार आणि डिझायनर आपली स्टाईल दाखवण्यासाठी उपस्थित राहतात. मात्र, इथे कोणीही सहज येऊ शकत नाही. फक्त खास आमंत्रण मिळालेल्यांनाच इथे प्रवेश आहे आणि तेही अशा व्यक्तींना ज्यांचं नाव कुठल्या वादग्रस्त प्रकरणांशी जोडलेलं नसतं.

कार्यक्रमाची जबाबदारी

1995 सालापासून वोग मासिकाच्या एडिटर-इन-चीफ असलेल्या अ‍ॅना विंटोर या मेट गालाच्या आयोजनाची आणि संपूर्ण नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. पाहुण्यांची यादी ठरवण्यापासून ते कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याची आखणी करण्यापर्यंत सगळं काही त्यांच्या नेतृत्वाखाली होतं.

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून सुरु होणारा मेट गाला, एना विंटोर यांच्या कल्पनाशक्तीमुळे आणि दृष्टीकोनामुळे फॅशन जगतातला एक भव्य आणि लक्षवेधी सोहळा ठरतो.

What is Met Gala
Kiara Baby Bump Viral : मेट गालामध्ये कियाराच्या बेबी बंपने वेधलं सर्वांचं लक्ष, पोटावरील हार्टमुळे ड्रेस ठरला युनिक

कार्यक्रमाची खासियत

मेट गालामध्ये फॅशनला जास्तीत जास्त महत्त्व मिळावं यासाठी एडिटर-इन-चीफ प्रयत्नशील असतात. इथे येणारा प्रत्येक पाहूणे सुगंध, स्टाईल आणि सुरेखतेचे प्रदर्शन करतो. म्हणूनच इथे गेस्टला वाढल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कांदा-लसूण वर्ज्य केलं जातं. याशिवाय ज्या पदार्थांमध्ये कांदा, लसूण आणि पार्सली जास्त प्रमाणात असतात असे पदार्थ समाविष्ट केले जात नाही.

मेट गालाची थीम

प्रत्येक वर्षी मेट गालासाठी एक ठराविक थीम असते, ज्यावर आधारित कपडे आणि संपूर्ण शो डिझाइन केला जातो. ही थीम एना विंटोर आणि त्यांची टीम मिळून ठरवते. यंदाची थीम २०१९ मध्ये निधन झालेल्या आणि प्रसिद्ध जर्मन फॅशन डिझायनर कार्ल लेगरफेल्ड यांच्या स्मरणार्थ आहे. 'इन ऑनर ऑफ कार्ल' अशी यावर्षीची थीम आहे.

दरवर्षी फक्त 400 ते 600 लोकांनाच या शोमध्ये सहभागी होता येतं आणि हे निमंत्रण मिळवणं हे सेलिब्रिटींसाठी एक प्रकारचं मानचिन्ह मानलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com