Navya Naveli Nanda: “मी आराध्याकडून खूप काही शिकलेय”; नव्यानं केलं मामेबहीणचं कौतुक

Navya Naveli Nanda: 12 वर्षांचा आराध्याला तू काय सल्ला देशील? असा प्रश्न नव्याला विचारण्यात आला. या प्रश्नाला नव्यानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Navya Naveli Nanda
Navya Naveli Nandaesakal

Navya Naveli Nanda: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) तिच्या युट्युबवरील पॉडकास्ट शोमुळे खूप चर्चेत असते. तिचा ‘व्हॉट द हेल नव्या?’ या शोमधून ती कायमच वेगवेगळ्या विषयांवर ती तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांच्याशी संवाद साधते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या आगामी पॉडकास्टमध्ये तिची मामी ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Rai Bachchan) दिसेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता पण या प्रश्नाचं उत्तर देणं तिने टाळलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिची मामेबहीण आराध्याबाबत वक्तव्य केलं.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नव्याला 12 वर्षांचा आराध्याला तू काय सल्ला देशील असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना नव्या म्हणाली,”आराध्य १२ वर्षांची आहे. पण ती तिच्या वयाच्या तुलनेने खूप जास्त हुशार आहे आणि तिला मी आयुष्याबद्दल कोणताही सल्ला देण्याची गरज नाही. आजकालची तरुण पिढी त्यांच्याहून वयाने मोठ्या असलेल्या लोकांपेक्षा खूप हुशार आहेत. त्यांच्यात जगात चांगले बदल करण्याची इच्छा आहे.” असं म्हणत तिने आराध्याचं कौतुक केलं.

आराध्याचं कौतुक करताना ती पुढे म्हणाली,”मला तिचं कौतुक वाटतं कि तिला इतक्या लहान वयात गोष्टींची जाणीव आहे, ती खूप समजूतदार आहे. गोष्टी शेअर करण्यासाठी घरात एक लहान बहीण असल्याचा मला आनंद आहे पण मला वाटत नाही कि मी तिला सल्ला देऊ शकेन. उलट मी तिच्याकडून खूप काही शिकतेय. ती तिच्या आयुष्यात खूप पुढे जाईल हे मला माहित आहे आणि मी त्याची वाट पाहतेय.”

Navya Naveli Nanda
Navya Naveli Nanda : 'जर माझ्यामागे बच्चन आडनाव नसतं तर...' अमिताभ यांची नात नव्या काय बोलून गेली?

आराध्या आणि नव्या यांचं बॉण्डिंग खूप चांगलं असून अनेकदा नव्याची आई श्वेतानेही आराध्याचं कौतुक केलं आहे. तर आराध्याचंही तिच्या दोन्ही भावंडांसोबत चांगलं नातं आहे.

सोशल मीडियावर नव्याचा ‘व्हॉट द हेल नव्या?’ हा पॉडकास्ट शो चांगलाच गाजत असून ती यात तिच्या आई आणि आजीशी आताच्या पिढीचे प्रश्न, त्यांचा दृष्टिकोन आणि जगात घडणाऱ्या गोष्टी यांवर चर्चा करताना दिसते. त्या तिघींचा बॉण्ड सगळ्यांनाच खूप पसंत पडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com