OM BHUTKAR
esakal
OM BHUTKAR WIFE PRERANA SATHIYA: प्रसिद्ध अभिनेता ओम भूतकर याचा मोठा चाहतावर्ग आहे. मुळशी पॅटर्न या सिनेमातून तो घराघरात पोहचला. आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं त्यानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्याने आता थांबायचं नाही, रावरंभा, श्यामची आई अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलय. दरम्यान अशातच ओमने चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. ओम भूतकरने गुपचूप लग्न उरकलं असून सध्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताय.