Pulkit Samrat: लग्नानंतर पुलकितनं सासुरवाडीत बनवला खास पदार्थ; क्रिती फोटो शेअर करत म्हणाली, "ग्रीन फ्लॅग अलर्ट"

Pulkit Samrat: पुलकितनं बनवलेल्या पदार्थाचे फोटो क्रितीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Pulkit Samrat And Kriti Kharbanda
Pulkit Samrat And Kriti Kharbandaesakal

Pulkit Samrat: अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) आणि अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) यांचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. या दोघांचा विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशताच आता लग्नाच्या काही दिवसानंतर पुलकितनं त्याच्या सासुरवाडीत एक खास पदार्थ बनवला आहे. पुलकितनं बनवलेल्या पदार्थाचे फोटो क्रितीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

क्रितीनं शेअर केले फोटो

क्रितीनं पुलकितच्या किचनमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पुलकित हा हलवा बनवताना दिसत आहेत. पुलकितच्या या फोटोला क्रितीनं कॅप्शन दिलं, "ग्रीन फ्लॅग अलर्ट! काल काहीतरी स्पेशल घडले, मी पुन्हा प्रेमात पडले. मला वाटत नव्हतं असं होईल, पण हे घडलं आहे"

"पुलकितची पहिली रसोई काल झाली. मी स्वयंपाकघरात गेले आणि मला लक्षात आले की, तो हलवा बनवत आहे. मी त्याला विचारले की तो काय करत आहे? त्याने सहजपणे उत्तर दिले, "हलवा बना रहा हूं, यह मेरी पहली रसोई आहे." मी हसून त्याला म्हणाले,"पहली रसोई लाडकी की होती है बेबी." ज्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, "तू आपल्या कुटुंबासाठी दिल्लीतील घरी स्वयंपाक केला, तर मी इथे बेंगळुरूमधील आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतोय, सिंपल!", असंही क्रितीनं कॅप्शनमध्ये लिहिलं.

पुढे पुलकितनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "होय, त्याने सिंपल हा शब्द वापरला. त्यामुळे सहजतेने त्याने आजूबाजूच्या सर्व गोष्टी बदलल्या . सर्व प्रामाणिकपणे तो करत होते. पुलकित सम्राट, तू माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला माणूस आहेस. तू सब्र का फल है बेबी, सबसे मीठा!"

Pulkit Samrat And Kriti Kharbanda
Kriti Kharbanda And Pulkit Samrat Wedding: शुभमंगल सावधान! क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी बांधली लग्नगाठ, पाहा लग्नसोहळ्याचे खास फोटो

क्रितीनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी या पोस्टला कमेंट करुन पुलकितचं कौतुक केलं.

वीरे की वेडिंग आणि तैश या चित्रपटांमध्ये क्रिती आणि पुलकित यांनी काम केलं आहे.पागलपंती या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रिती आणि पुलकित हे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Pulkit Samrat And Kriti Kharbanda
Pulkit Samrat And Kriti Kharbanda: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल; काय आहे खास?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com