
Pushpa 2 Latest Marathi News : पुष्पा २ आता प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला आणि अभिनेता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना सिनेमाला तुफान प्रतिसाद दिला आहे. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी या सिनेमाच्या प्रिमियरवेळी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये सिनेमा आणि अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती.
या गर्दीमुळं चेंगराचेंगरी होऊन त्यात एका महिलेला मृत्यू झाला होता. तर तिचा मुलगा या घटनेत गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेवर आता अल्लू अर्जुननं दुःख व्यक्त केलं आहे. त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचा व्हिडिओ शेअर केला असून आपण मृत महिला आणि जखमी लोकांना मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.