भारतीय हवाई सेनेनं पाकिस्तानमधील 9 दहशवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव देण्यात आलं होतं. दरम्यान या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानातील वाद वाढला आहे. हल्ल्यापासून वाचण्यासाठी मॉक ड्रिल सुद्धा केले जाताय. दरम्यान देशातील ही परिस्थिती पाहता राजकुमार राव याने मोठा निर्णय घेतला आहे. 'देश प्रथम' हे तत्व बाळगून त्याने लवकरच प्रदर्शित होणारा 'भूल चूक माफ' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे सगळीकडे राजकुमार राव आणि संपूर्ण टीमचं कौतूक होत आहे.