Rajpal Yadav Surrender : राजपाल यादवचं तिहार तुरुंगात आत्मसमर्पण! ; ‘चेक बाउन्स’ प्रकरणी न्यायालयाने दिला होता अल्टिमेटम

Rajpal Yadav surrenders in Tihar Jail : दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राजपाल यादवला तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण येण्यास दिलेली अंतिम मुदत वाढविण्यास नकार दिला होता
Rajpal Yadav Surrenders in Tihar Jail

Rajpal Yadav Surrenders in Tihar Jail

esakal

Updated on

Rajpal Yadav Cheque Bounce Case : अभिनेता राजपाल यादव गुरुवारी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण गेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाउन्स प्रकरणात त्याच्या शिक्षेच्या बाबतीत कालावधी वाढवण्यास नकार दिला होता आणि त्याला तिहार तुरुंगात शरण येण्याचे आदेश दिले होते.

 दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राजपाल यादवला तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण येण्यास दिलेली अंतिम मुदत वाढविण्यास नकार दिला होता आणि २ फेब्रुवारी रोजी बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत शरण येण्याचे निर्देश देण्यात आले होते.

राजपाल यादवच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते की, त्यांनी ५० लाख रुपयांची व्यवस्था केली आहे आणि पैसे भरण्यासाठी एका आठवड्याची वेळ मागितली होती. मात्र, न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांनी राजपाल यादवची शरण येण्याची मुदतवाढ देण्याची विनंती फेटाळून लावली आणि म्हटले की, त्यांना ही सवलत देण्यासाठी कोणताही आधार नाही.

Rajpal Yadav Surrenders in Tihar Jail
Coal Mine Blast : कोळसा खाणीत भीषण स्फोट!, दहा कामागारांचा मृत्यू ; अनेक कामगार अडकले असल्याचीही भीती

राजपाल यादवने मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून अंदाजे पाच कोटींचे कर्ज घेतले होते. कंपनीचा दावा आहे की राजपाल यादवने पैसे परत करण्यासाठी अनेक चेक दिले होते, परंतु ते सर्व बाउन्स झाले. यानंतर कंपनीने  राजपाल यादवविरुद्ध चेक बाउन्स झाल्याचा खटला दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com