ठरलं तर मग! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार 'या' दिवशी उडणार, उदयपूरमध्ये होणार शाही विवाहसोहळा

Rashmika Mandanna & Vijay Deverakonda’s Royal Udaipur Wedding : दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपं रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चांना जोर आला आहे. उदयपूरमधील राजवाड्यात शाही विवाहसोहळा होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Rashmika Vijay Wedding

Rashmika Mandanna & Vijay Deverakonda’s Royal Udaipur Wedding

esakal

Updated on

दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपं रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगत होत्या. दोघांचे कुटुंब लग्नासाठी भेटल्याच्या चर्चा देखील होत्या. दरम्यान अशातच आता दोघेही खरंच लग्न करणार आहे का? असा प्रश्न पडला असेल तर ते सत्य आहे. कारण रश्मिका आणि विजय यांचं फेब्रुवारीमध्ये राजस्थानमधील उदयपूरमध्ये लग्न होणार आहे. परंतु दोघांकडून अजूनही कोणती अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com