VIDEO: सारा करत होती पुण्याचं काम, फोटोग्राफर्स तिथेही आले अन् सैफची लेक भडकली; म्हणाली...

Sara Ali Khan: व्हिडीओमध्ये सारा ही मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरजूंना अन्न देताना दिसत आहे. साराच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Sara Ali Khan
Sara Ali Khanesakal

Sara Ali Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. साराला अनेक वेळा पापाराझी स्पॉट करते. सारा अनेक वेळा स्ट्रीट शॉपिंग करताना किंवा विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना स्पॉट होते, अशातच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती पुण्याचे काम करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सारा ही मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरजूंना अन्न देताना दिसत आहे. साराच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पापाराझीवर भडकली सारा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सारा ही गरजू मुलांना फूड पॅकेट वाटताना दिसत आहे. यावेळी, जेव्हा पापाराझी तिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सारा भडकते.

पापाराझी फोटो काढत असल्याचं जेव्हा सारा अली खानच्या लक्षात येतं तेव्हा ती चिडते आणि म्हणते, "थांबा! कृपया शूट करू नका. मी तुम्हाला हे अनेकवेळा सांगितलं आहे"

पाहा व्हिडीओ:

साराचे चित्रपट

सारा अली खानचे नुकतेच 'मर्डर मुबारक' आणि 'ए वतन मेरे वतन' हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या दोन्ही चित्रपटातील साराच्या कामाचे अनेकांनी कौतुक केलं आहे.

सारासोबतच सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, एलेक्स नील आणि आनंद तिवारी या कलाकारांनी 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांची कथा 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.

Sara Ali Khan
Sara Ali Khan: "देश की कहानी, उषा की जुबानी"; सारा अली खानच्या 'ऐ वतन मेरे वतन' ची रिलीज डेट जाहीर

तसेच साराचा 'मर्डर मुबारक' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे.पंकज त्रिपाठी,करिश्मा कपूर, विजय वर्मा, विजय वर्मा या कलाकारांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे.

Sara Ali Khan
Murder Mubarak Review: दमदार कथा पण कलाकारांच्या अभिनयामुळे गंडला 'मर्डर मुबारक'; वाचा रिव्ह्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com