Shiv Thakare supports CJP NEET protest
esakal
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे काँकरोज जनता पार्टीच्यावतीने आंदोलन सुरू असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारत पाठिंबा दिला आहे. आता या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून अभिनेता शिव ठाकरे यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.